पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात दहा, खामगाव पाच, शेगाव दोन, देऊळगाव राजा चार, चिखली चार, मेहकर एक, मलकापूर पाच, लोणार तीन, मोताळा एक, जळगाव जामोद दोन, सिंदखेड राजा आणि संग्रामपूर तालुक्यात प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. तपासणीमध्ये नांदुरा तालुक्यात एकही जण कोरोना बाधित सापडला नाही. तसेच गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
दुसरीकडे शनिवारी ४६ जणांनी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ४५ हजार ७९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ८५ हजार ४६५ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
--१,६९३ अहवालांची प्रतीक्षा--
अद्यापही १ हजार ६९३ संदिग्ध रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८६ हजार २०७ झाली आहे. त्यापैकी ८९ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात ६५३ कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे.
--जिल्ह्याचा मृत्यूदर ०.७६ टक्के ---
जिल्ह्याचा मृत्यूदर सध्या ०.७६ टक्के असून, अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९९.१४ टक्क्यांवर पोहोचले आहे. शनिवारचा पॉझिटिव्हिटी रेट १.२० टक्के आहे. गेल्या तीन महिन्यानंतर पॉझिटिव्हिटी रेट जून महिन्यात झपाट्याने घटत असल्याचे चित्र आहे.