धाड : काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असलेला ४० कट्टे गहू धाड पाेलिसांनी १८ जुलैला तराडखेड येथे जप्त केला़ यावेळी पाेलिसांनी ६ लाख ३२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे तसेच आराेपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाड पाेलिसांचे एक पथक १८ जुलैला रात्री गस्तीवर असताना तराखडे गावाजवळ एका वाहनातून रेशनचा गहू काळ्या बाजारात जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी एमएच २१- बीएच ४४८ जप्त करून तपासणी केली असता त्यामध्ये ४० कट्टे गहू आढळला़ यावेळी वाहनचालकाने पाेलिसांना पाहताच वाहन साेडून घटनास्थळावरून पळ काढला़ पाेलिसांनी वाहनातील एकास अटक करून वाहनातील ४० कट्टे गहू किंमत ३२ हजार आणि वाहन असा ६ लाख ३२ हजारांचा ऐवज जप्त केला़ याप्रकरणी आराेपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धाड पाेलीस करत आहेत़