लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विदर्भाची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या संत नगरी शेगाव येथील संत गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव ७ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या महोत्सवासाठी श्रींच्या दर्शनासाठी जाणा-या भाविक भक्तांसाठी महामंडळाच्या वतीने अतिरीक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. महामंडळाच्या सात आगारातून ४३ जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.पायदळ दिंड्यासह उपलब्ध असलेल्या वाहनांने प्रवास करुन भाविक भक्त श्रींच्या दर्शनासाठी प्रगटदिनाला शेगावनगरी गाठतात. हजारोंच्या संख्येने शेगाव गाठणा-या भाविक भक्तांना त्रास होऊ नये म्हणुन परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातील सात आगारातून ४३ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे सकाळी पाच वाजतापासून रात्री अकरा वाजेपर्यंत महामंडळाची सेवा सुरु राहणार आहे.
असे आहे महामंडळाचे नियोजनखामगाव - ७मलकाूपर - ३जळगाव जामोद - ३मेहकर - ८बुलडाणा - ५शेगाव - १०चिखली - ७
गर्दी वाढल्यास अधिक सोडल्या जाणार बसेस सात आगारातून ४३ जादा बस सोडण्यात येणार आहेत. यासोबतच भाविक भक्तांची गर्दी वाढल्यास संग्रामपूर, मोताळा, नांदुरा, सिंदखेडराजा आणि देऊळगावराजाहूनही अधिकच्या जादा बसेस सोडण्यात येतील अशी माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.