बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे़ जिल्ह्यातील ४३ जणांनी काेराेनावर मात केली असून, ३५ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ तसेच ३ हजार ३४१ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ शेगाव, मलकापूर, संग्रामपूर आणि माेताळा तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळला नाही़
पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहर २, बुलडाणा तालुका अजिसपूर २, खामगाव शहर १, मोताळा तालुका कोथळी २, सिं.राजा तालुका नागझरी १, वाकड १, नांदुरा शहर ७, नांदुरा तालुका टाकरखेड १, जिगाव १, लोणार शहर २, लोणार तालुका सावरगाव १, देऊळगाव १, वझर १, गोत्रा १ ,कारेगाव १, मेहकर शहर २, मेहकर तालुका हिवरा आश्रम १, दे.राजा तालुका भिवगन ३, जळगाव जामोद शहर २, चिखली तालुका बेराळा येथील दाेघांचा समावेश आहे़ आजपर्यंत जिल्ह्यात ५ लाख ५८ हजार १३२ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत़ जिल्ह्यात १४०९ नमुने काेविड निदानासाठी घेण्यात आले आहेत़
११० बाधितांवर उपचार सुरू
जिल्ह्यात आज अखेर एकूण ८६ हजार ४४१ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी ८५ हजार ६७५ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ११० कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ६५६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.