बुलडाणा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा आज १ मार्चपासून सुरू होणार असून, जिल्ह्यात १४६ परीक्षा केंद्रावरून नियमित ४१ हजार ४0४ व १ हजार ५८१ पुनर्परीक्षार्थी असे मिळून एकूण ४२ हजार ९८५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे.दहावीच्या परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. केंद्रप्रमुख आणि परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी पालकसभा आयोजित करून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. शिवाय सर्व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेची शपथ देण्यात आली. दहावीची परीक्षा २९ मार्चपर्यंत चालणार आहे. दरम्यान परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळता यावा, यासाठी विविध पथक तयार करण्यात आले आहे. यात भरारी पथक, राजस्व विभागाचे पथक, बैठे पथक आहे. भरारी पथकात सहा अधिकार्यांचा समावेश असून, यात शिक्षण अधिकारी माध्यमिक, शिक्षण अधिकारी प्राथमिक, शिक्षण अधिकारी निरंतर, उपशिक्षण अधिकारी, विशेष महिला पथक, विशेष भरारी पथकाचा समावेश आहे. तर राजस्व विभागाच्या पथकात प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांना परीक्षा केंद्रांवर भेट देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
४३ हजार विद्यार्थी देणार परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2016 1:24 AM