शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

४.३१ लाख शेतकर्‍यांची धान्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:56 AM

बुलडाणा : शेतकर्‍यांसाठी असलेले धान्य शासकीय स्तरावरू विलंबाने मिळत आहे तर अनेक ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदार शेतकरी लाभार्थ्यांपर्यत सदर धान्य पोहचवितच नसल्याने लाभार्थ्यांना स्वस्त धान्यासाठी प्रत्येक महिन्याला पायपीट करावी लागते.

ठळक मुद्देदर महिन्याला होतो विलंब शेतकर्‍यांसाठी जिल्ह्यात येते २१५५0 क्विंटल धान्य

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकर्‍यांसाठी असलेले धान्य शासकीय स्तरावरू विलंबाने मिळत आहे तर अनेक ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदार शेतकरी लाभार्थ्यांपर्यत सदर धान्य पोहचवितच नसल्याने लाभार्थ्यांना स्वस्त धान्यासाठी प्रत्येक महिन्याला पायपीट करावी लागते.दुष्काळामुळे शेतकर्‍यांसाठी एपीएल धान्य वाटप योजना सुरू करण्यात आली आहे.  केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने स्वस्त धान्य योजना शेतकर्‍यांसाठी लागू करण्यात आली असून, जिल्ह्यात ४ लाख ३१ हजार २११ लाभार्थी या योजनेचा लाभ घेतात. प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ अल्प दरात देण्याची ही योजना आहे. तांदूळ ३ रुपये किलो, तर गहू २ रुपये किलो दराने या लाभार्थ्यांना दिला जातो. त्यासाठी गहू ४ ७ हजार २४0 क्विंटल तर तांदूळ ४ हजार ३१0 क्विंटल पुरवठा केला जातो. मात्र  वारंवार या धान्याचे वितरण विलंबान होते. तर कधी स्वस्त धान्य दुकानदारच सदर योजनेचे धान्य शेतकरी लाभार्थ्यांपर्यत पोहचवत नाहीत. जून महिन्याचा तांदुळ तर अद्यापपर्यंत मिळालाच नाही. गहू व तांदळाच्या खरेदीचे दर वाढले आहेत. त्यामुळे शासकीय गोदामातून धान्याची उचल झाल्यानंतर सदर गाडी बाहेरच काळ्याबाजारत जात असल्याचे प्रमाण वाढले आहे. गहू व तांदूळ काळ्याबाजार विक्री होत असल्याने प्रशासनाकडूनही कार्यवाहीसाठी प्रत्येक तालुकास्तरावर पथक नेमण्यात आलेले आहे. त्यामुळे पथकाकडून चौकशी सुद्धा सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात या योजनेच्या सुरूवातीपासूनच प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचे धान्य वेळेवर पोहचले नाही. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने ही योजना सुरू आहे. परंतु, दरवाढीमुळे लाभार्थ्यांना गहू, तांदळाची प्रतीक्षा करावी लागत आहे.  

असा होतो शेतकरी लाभार्थींच्या धान्याचा पुरवठा ४जिल्ह्यात ४ लाख ३१ हजार २११ शेतकरी लाभार्थ्यांकरिता गहू १७ हजार २४0 क्विंटल व तांदुळ ४ हजार ३१0 क्विंटल पुरवठा होतो. त्यामध्ये बुलडाणा गहू  ५५२ क्विंटल व तांदूळ ४५0,  चिखली गहू १ हजार ९२६ व तांदुळ ४00 क्विंटल, अमडापूर गहू ५५२ व तांदूळ १00,  देऊळगाव राजा गहू १ हजार ७१ व तांदूळ ५00 क्विंटल, मेहकर गहू ७५८ व तांदूळ ४५0, डोणगांव गहू ६२४ व तांदूळ १५0 क्विंटल, लोणार गहू १ हजार ५८४ क्विंटल व तांदूळ ४00,  सिंदखेड राजा गहू १ हजार ५0५ क्विंटल व तांदूळ ३00 क्विंटल, साखरखेर्डा गहू १ हजार ५0  व तांदूळ ११0 क्विंटल, मलकापूर गहू ५९२ व तांदूळ २५0 क्विंटल, मोताळा गहू १ हजार ५६0 व तांदूळ २00 क्विंटल, नांदूरा गहू १ हजार ११३ व तांदूळ २00 क्विंटल, खामगांव गहू १ हजार ३५ व तांदूळ २00, शेगांव गहू १ हजार ४0६  व तांदूळ २00, जळगांव जामोद गहू १ हजार ३५७ व तांदूळ २00, संग्रामपूर गहू ५५५ व तांदूळ २00 क्विंटल पुरवठा करण्यात येतो.