लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या महिन्यात ११ आणि १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपिटीची ४४ कोटी ६६ लाख २६ हजार रुपयांची नुकसान भरपाई बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळणार आहे. त्यासंदर्भा तील मदत महसूल व वन विभागाने जाहीर केली आहे; मात्र अद्याप विभागीय आयुक्त स्तरावरून त्या संदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला उपलब्ध न झाल्यामुळे ही रक्कम प्रत्यक्ष शेतकर्यांच्या खात्यात कधी पडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील ३५६ गावांना तडाखा बसला होता. प्राथमिक अंदाजानुसार यामध्ये एक लाख ९१ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याला मोठय़ा प्रमाणावर नुकसानभरपाई मिळेल, असा अंदाज व्य क्त केला जात होता; मात्र प्रत्यक्षात बुलडाणा जिल्ह्यातील ३४ हजार ९३ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचे आता स्पष्ट होत असून, त्यापोटी ही ४४ कोटी ६६ लाख २६ हजार रुपयांची नुकसान भरपाई दोन हेक्टरच्या र्मयादेत मिळणार आहे; मात्र ती प्रत्यक्ष खात्यात कधी पडेल, हाही कळीचा मुद्दा आहे आणि प्रत्यक्षात किती शेतकर्यांचे नुकसान झाले, हा मुद्दाही अद्याप गुलदस्त्यात आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली होती. त्याच्या नुकसानापोटी राज्यात ३१३ कोटी ५९ लाख ६३ हजार रुपयांची मदत जाहीर करण्या त आली असून, यामध्ये राज्यात एक लाख ४८ हजार ५0३ हेक्टर जिरायती, एक लाख सहा हजार ७४0 हेक्टर बागायती तर ३८ हजार ४६ हेक्टर बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते. त्यापोटी ही रक्कम दिली जात आहे. ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्यांना १३ मे २0१५ च्या निर्णयानुसार देण्यात येत आहे.
असे आहे बाधित क्षेत्रजिल्ह्यात तीन हजार ५४६ .३९ हेक्टर जिरायती तर २८ हजार २९७.८८ हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांचे दोन हजार २४९.४0 हेक्टर क्षेत्र गारपिटीमुळे बाधित झाले आहे. त्यापोटी ही ४४ कोटी ६६ लाख रु पयांची मदत राज्य शासनाने नुकसानभरपाई म्हणून जाहीर केली आहे.