निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील ६८३ तर रॅपिड टेस्टमधील १५५ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर, सवणा, रानअंत्री, उंद्री येथे प्रत्येकी एक व चिखली शहरात १० रुग्ण सापडले. दे. राजा शहरात चार, देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर एक, खामगाव शहर पाच, खामगाव तालुक्यातील पळशी, शेलोडी, पोरज येथे प्रत्येक एक रुग्ण आहे. बुलडाणा शहर दोन, बुलडाणा तालुक्यातील सुंदरखेड दोन, लोणार शहरात दोन, लोणार तालुक्यातील शिवणी पिसा एक, शेगाव शहरात सात, मलकापूर तालुक्यातील दुधलगाव, नांदुरा तालुक्यातील शेंबा, वडनेर, मोताळा तालुक्यातील वरूड एक, मूळ पत्ता मुक्ताईनगर जि. जळगाव एक, टेंभुर्णी जि. जालना येथील एक संदिग्ध व्यक्ती पॉझिटिव्ह आहेत.
३१ रुग्णांनी कोरोनावर मात
३१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना गुरुवारी वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्णांमध्ये खामगाव १०, बुलडाणा दिव्यांग विद्यालय एक, स्त्री महाविद्यालय एक, शेगाव १३, दे. राजा चार, चिखली दोन रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.