लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: चार महिन्यानंतर शासनाने आंतरजिल्हा बस वाहतुकीस परवानगी दिल्याने गुरुवारी सात आगारातून बसगाड्या सोडण्यात आल्या. तर दुसºया दिवशीही ४७ शेड्यूल सोडण्यात येत आहेत. पहिल्याच दिवशी पाच हजार ३८५ किलोमिटर बस धावल्या. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळाल्याने दुसºया दिवशीही ही सेवा सुरळीत सुरू करण्यात आली. या सर्व आगाराच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात आले आहे.मेहकर एस टी आगाराच्या लांब पल्ला, मध्यम लांब पल्ला मार्गावर 23 बसगाड्या ५ हजार ३८५ किलोमिटर धावल्या. प्रवाशांचा प्रतिसाद अतिशय उत्तम असल्याचे दिसून आले.कोरोनामुळे बस वाहतूक बंद होती. २२ मे पासून जिल्ह्यांतर्गत बस वाहतूक सुरू होती. परंतु प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र गुरूवारपासून जिल्ह्याबाहेर प्रवाशी वाहतूक सुरू झाली. लांबच्या मार्गावर बसगाड्या उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. दुसºया दिवशीही सकाळपासूनच प्रवाशांनी बसस्थानकावर येण्यास सुरूवात केली होती. मेहकर येथून नागपूर, लातूर, पंढरपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, जळगाव खान्देश, अकोला आदी मार्गावर बसगाड्या रवाना करण्यात आल्या. बुलडाणा, खामगाव, लोणार, अमडापूर मार्गावरही बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक रणवीर कोळपे यांनी दिली.
सकाळपासूनच प्रवाशांची गर्दीमेहकर येथून नागपूर सकाळी साडेसात वाजता, पंढरपूर सव्वाआठ, नाशिक त्रंबकेश्वर सात वाजता, औरंगाबाद 7 वाजता, पुणे आठ वाजता,लातूर पावणेदहा वाजता, जळगाव खान्देशसाठी सात, आठ, नऊ व दहा वाजता बस सोडण्यात आली. पल्यिा दिवशीश प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्याने दुसºया दिवशीची बस सेवा सकाळपासूनच सुरळीत सुरू झाल्या.