तीन दिवसांत जिल्ह्यात पावसाची हजेरी
बुलडाणा : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार २९ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान बहुधा जिल्ह्यात सर्वत्र हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पथदिवे बंद असल्याने अनेक भागांत अंधार
बुलडाणा : शहरातील अनेक भागांतील पथदिवे गत काही दिवसांपासून बंद असल्याने अंधार पसरला आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. नागरिकांनी विविध भागांतील पथदिवे सुरू करण्याची मागणी केली आहे.
लाेककलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी
बुलडाणा : कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून लोककलावंत मोठ्या अडचणीत सापडले आहेत. ज्येष्ठ लोककलावंतांना शासनाकडून २५ हजार रुपये आर्थिक मदत, मानधनात दुप्पट वाढ करावी यांसह विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन नुकतेच लोककला सांस्कृतिक मंच तसेच महात्मा फुले बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ, जांभोरा यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
प्रलंबित रेशन कार्ड वितरित करण्याची मागणी
बुलडाणा : मेहकर तालुक्यात महसूल प्रशासनाच्या वतीने राजस्व अभियान राबवून पुरवठा विभागातील योजनांबाबत जनजागृती करून माहिती व योजनेचा लाभ द्यावा. प्रलंबित रेशन कार्ड वाटप करावे तर बंद रेशनकार्ड ऑनलाइन करून धान्यवाटप करावे, अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.