बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा आलेख घसरला असून साेमवारी ५०९ जणांनी काेराेनावर मात केली आहे़ काेराेना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूची संख्या कायम असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे़ आणखी ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ४२७ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ तसेच २ हजार ९७४ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले आहेत़
उपचार दरम्यान जळकी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथील ५५ वर्षीय महिला, चिखली येथील ५० वर्षीय महिला, जय अंबे नगर शेगाव येथील ६१ वर्षीय पुरुष, माळवंडी ता. बुलडाणा येथील ४० वर्षीय महिला, धाड ता. बुलडाणा येथील ६० वर्षीय महिला, पि. देशमुख ता. खामगाव येथील ७० वर्षीय पुरुष, आंबे टाकळी ता. खामगाव येथील ८५ वर्षीय महिला, इकबाल चौक बुलडाणा येथील ४३ वर्षीय पुरुष, चिखली येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील ३८, बुलडाणा तालुका हतेडी ४, पाडळी ३, सुंदरखेड २, कोलवड ३, दुधा ३, दहीद ४, खुपगाव २, येळगाव २, मोताळा शहर २, मोताळा तालुका पि. नाथ २, बोरखेडी २, खामगाव शहर १५ , खामगाव तालुका पारखेड १, जनुना १, शेगाव शहर ६, शेगाव तालुका माटर गाव २, भोनगाव १, चिखली शहर ९, चिखली तालुका अंचरवाडी १, लोणी लव्हाळा १, धोत्रा १, दहिगाव १, किन्होळा १, धोडप १, बेराळा दे. राजा शहर ३४, दे. राजा तालुका अंभोरा ४, पिंपळगाव ४, सातेगाव ४, पांगरी २, सावखेड भोई २, सिनगाव जहा १०, जांभोरा २, कुंभारी २, , मेंडगाव २, आळंद २, उंबरखेड २, उमरज २, शिराळा ३, जवळखेड ६, सिं. राजा शहर ५, सिं. राजा तालुका शिवणी टाका १, वाघाळा १, वडाळी १, साखरखेर्डा ४, दुसरबीड २, सवडत २, लिंगा २, नशिराबाद २, मेहकर शहर ३, मेहकर तालुका जानेफळ १, कल्याणा १, जाऊळका १, आंध्रुड ३, वर्दाडी १, नागापूर २, संग्रामपूर तालुका उमरा १, पळशी ४, अकोली २, सोनाळा ३, पिंगळी १४, टुनकी १०, एकलारा २, लाडणापूर १९, बावन बिर ३, आलेवाडी २,
जळगाव जामोद शहर ७, जळगाव जामोद तालुका सुनगाव ३, काजेगाव ४, चावरा २, वडगाव गड ३ नांदुरा शहर ५, नांदुरा तालुका महाळुंगी १, वसाडी २, लोणार शहर २, लोणार तालुका चिखला १, सुलतानपूर १, पिंपरी खंडारे येथील दाेन रुग्णांचा समावेश आहे़
जिल्ह्यात ५६७ जणांचा मृत्यू
तसेच आजपर्यंत ४ लाख ५१ हजार ५२८ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ७७ हजार ४९४ कोरोना बाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी २ हजार ७२० नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८२ हजार ७६३ कोरोना बाधित रूग्ण असून त्यापैकी ७७ हजार ४९४ कोरोना बाधित रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ४ हजार ७०२ कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ५६७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.