शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमदनगरमध्ये  अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 4:37 PM

कंत्राटदाराकडून कोणतीही मदत होत नसल्याने या मजुरांना हालअपेष्टा सहन करावी लागत आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणू संक्रमनामुळे सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे राज्यासह परराज्यातील स्थलांतरीत मजुरांची चांगलीच परवड होत आहे. महाराष्ट्रातील मजूर दुसºया राज्यात तर परराज्यातील मजूर महाराष्ट्रात अडकले असतानाच,  खामगाव तालुक्यातील ५१ स्थलांतरीत मजूर अहमदनगर येथे अडकल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. कंत्राटदाराकडून कोणतीही मदत होत नसल्याने या मजुरांना हालअपेष्टा सहन करावी लागत आहे.कोरोना विषाणू संक्रमनामुळे २३ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. या लाकडाउनमुळे राज्यातील विविध ठिकाणी स्थलांतरीत मजूर अडकून पडले असून, खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमद नगर येथील दरेवाडी मिल्ट्री कॅम्प, एमआयडीसी गेट नं.३ परिसरात गत ४० दिवसांपासून अडकलेत. त्यांच्या जवळची सर्वच संसाधन संपल्याने या मजुरांचे चांगलेच हाल होत असल्याने आमची सोडवणूक करा!, अशी प्रार्थना या मजुरांकडून केली जात आहे. गत अनेक दिवसांपासून त्रस्त झालेल्या या मजुरांनी रविवारी सकाळी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मोबाईलवर संपर्क साधून खामगाव येथे आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे.खामगाव तालुक्यातील विविध गावातील स्थलांतरीत मजूर तसेच कामगार मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, सुरत आणि अहमदाबाद येथे वास्तव्यास आहेत. लॉकडाउनमुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे अनेक मजुरांचा रोजगार हिरावला गेला आहे. अशातच पोटाची खळगी भरण्यासाठी खामगाव तालुक्यातून अहमदनगर येथे गेलेले ५१ मजूर अचडणीत सापडले आहेत.स्थानिक प्रशासनाशी संपर्क होत नसल्याने या मजुरांचे गत काही दिवसांपासून चांगलेच हाल होत आहेत. मिल्ट्री कॅम्प सोडल्यानंतर त्यांना पुन्हा तेथे प्रवेशांची अडचण निर्माण होईल. त्यामुळे  अडकलेले मजूर चांगल्याच द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. कंत्राटदाराने सोडले वाºयावर!खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमद नगर येथील मिल्ट्री कॅम्पच्या निर्माणासाठी गेले होते. दरम्यान, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कंत्राटदार तेथून निघून गेला. कोणतीही मदत मिळत नसल्याने या मजुरांची उपासमार होत आहे. खामगाव तालुक्यातील रमेश खंडारे, गणेश खंडारे, वंदना खंडारे, गोविंदा इंगळे, शितल वानखेडे, अनंत मेढे, रजनी मेढे, सुधाकर इंगळे, प्रतिभा इंगळे, तेजराव धुरंधर, ललीता धुरंधर, संजय बाम्हदे, मंदा बाम्हदे, जगन्नाथ सुरडकर, अनिता सुरडकर, मिठाराम खंडारे, मनकर्णा खंडारे, शालीग्राम हेलोडे, शशीकला हेलोडे, प्रकाश तायडे, राजू विरघट, सुरज इंगळे, भास्कर इंगळे, अशोक वाकोडे, शिला वाकोडे, श्रीकृष्ण इंगळे, रोशन वाकोडे, गौतम लांडगे, अनिता लांडगे, मुकिंदा सावळे, प्रतिभा सावळे,मंगेश तेलंग, सविता तेलंग, आराध्या तेलंग, अशोक गवई, रंजना गवई, सिध्दार्थ इंगळे, सिमा इंगळे, तुलशीराम भोसले, संजय खंडारे, जिवन इंगळे, श्रीकांत वानखडे, अतुल गायकवाड,मिलींद वानखेडे, दिलीप इंगळे, जनार्धन वानखडे, सुहानी मेढे, देविका मेढे, ऋतुजा इंगळे, सृष्टी खंडारे आदी स्थलांतरीत मजूर आणि त्यांचे कुटुंबिय फसले आहेत.

 शंकर नगर, खामगाव येथील  प्रकाश तायडे यांनी मोबाईलवर अहमदनगर येथील मिल्ट्री कॅम्पमध्ये अडकल्याची माहिती दिली. मजुरांचे आधारकार्ड  आणि त्यांची नावे आणि फोटो पाठविले आहेत. खामगाव येथे परत आणण्यासाठी मदतीची अपेक्षा केली आहे. त्यानुसार खामगाव तालुका प्रशासनाशी संपर्क साधला आहे.-जसवंतसिंग शिखसामाजिक कार्यकर्ता, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावLabourकामगारAhmednagarअहमदनगर