निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ६६९ तर रॅपिड टेस्टमधील ७६० अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह अहवालामध्ये बुलडाणा शहरात ८८, बुलडाणा तालुक्यातील माळवंडी, साखळी खु, पांगरी येथे प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सुंदरखेड येथे सहा, कोलवड दोन, येळगाव पाच, माळविहीर एक, रायपूर दोन, नांद्राकोळी दोन, पाडळी एक, मासरुळ एक, तराडखेड एक रुग्ण आढळून आला आहे. खामगांव शहरात ८१, खामगांव तालुक्यात सुटाळा ११, कोक्ता एक, पळशी दोन, अंत्रज, रोहना, गोंधणपूर, विहीगाव तीन, हिवरखेड, संभापूर दोन, आवार पाच, गणेशपूर तीन, घाटपुरी १०, निंभोरा एक, शिरसगाव एक, नांदुरा तालुक्यात निमगाव एक, मलकापूर शहरात सहा, चिखली शहरात २६, चिखली तालुक्यातील शेलूद दोन, भरोसा एक, सवणा दोन, सातगाव भुसारी एक, पळसखेड दौलत चार, धोत्रा भनगोजी एक, उंद्री दोन, केळवद दोन, पांढरदेव, एकलारा, भाणखेड, भोकर, तेल्हारा, सोमठाना, सिंदखेड राजा शहरात २३, सिंदखेड राजा तालुक्यात साखर खेर्डा ७, कंडारी एक, शेंदुर्जन दोन, गोरेगाव सहा, दुसरबिड तीन, पांगरी दोन, शिंदी, बाळ समुद्र, पोफळशिवणी, बारलिंगा, सवडत, हनवतखेड, पिपळगाव लेंडी, राहेरी, शेलू, शेळगाव काकडे येथे प्रत्येक एक रुग्ण आढळून आला आहे. मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी दोन, धामणगाव बढे तीन, बोराखेडी एक, कोथळी, जयपूर एक, आव्हा १२, पुन्हई, लिहा, रामगाव एक, मोताळा शहर एक, शेगांव शहर २५, देऊळगाव राजा शहर १८, लोणार शहरात १६, मेहकर शहरात १५ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्याचप्रमाणे, उपचारादरम्यान निपाना ता. मोताळा येथील ५७ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
५१८ कोरोना पॉझिटिव्ह, एक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:35 AM