शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..?";वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा
2
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
4
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
6
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
7
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
8
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
9
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
10
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
11
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
12
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
13
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
14
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
15
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
16
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
17
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
18
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
19
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
20
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...

३६0 दिवसात ५४५ चो-या

By admin | Published: December 25, 2014 1:48 AM

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार; पोलिसांपुढे आव्हान, चोरीच्या घटनांचा आलेख वाढला.

बुलडाणा : जिल्ह्यात सध्या चोरट्यांचा धुमाकूळ वाढतच आहे. शहरांसह ग्रामीण भागातही क्षुल्लक चोर्‍यांसह घरफोडीसारख्या घटनांमध्ये सराईत असलेल्या चोरट्यांचा मोर्चा आता प्राचीन व ऐतिहासिक वस्तुंकडे वळला आहे. चोरीच्या अशा घटनांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून, २0१४ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून, ३६0 दिवसात तब्बल ५४५ चोरीच्या घटना जिल्ह्यात उघड झाल्या आहेत. अशा घटना रोखणे मात्र पोलिसांपुढेही आव्हान ठरू लागल्या आहेत.जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातून वाढलेली बेरोजगारी व दैनंदिन गरजा पूर्ण पूर्तीसाठी गुन्हेगार चोरीच्या नव-नव्या क्लृप्त्यांचा शोध लावत आहे. त्यामुळे जिल्हा तसेच तालुक्याच्या ठिकाणी पोलिसात दाखल होणार्‍या चोरी, घरफोडी, लूटमार व इतर गुन्ह्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. या चोर्‍यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना फारसे यश आलेले नाही. एखाद दोन घटनांचा तपास वेगात लागतो. इतर प्रकरणांचा तपास रेंगाळत राहतो, असाच अनुभव आतापर्यंत आहे. त्यामुळे पोलिसांसमोरचे आव्हान वाढले असून, सिंदखेडराजामधील तोफ चोरीच्या प्रकरणाचा छडा लावणे पोलिसांसाठी आव्हानाचेच नाही तर प्रतिष्ठेचेही झाले आहे.सिंदखेडराजा येथे १६ व्या शतकाच्या अनेक वास्तु येथे उभ्या आहेत, या वास्तुमधील अनेक ऐतिहासिक वास्तु याआधी गायब झाल्या आहेत. येथील दिगंबर जैन मंदिरातून २४ तीर्थंकरांची पंचधातूची मूर्ती १३ ऑक्टोबर २0१३ रोजी चोरीला गेली होती. या घटनेला १४ महिने पूर्ण झाले. २२ डिसेंबरच्या रात्री राजवाड्यातून ८५ किलो वजनाची पंचधातूची तोफ चोरीला गेली. १0 वर्षांपूर्वी साखरखेर्डा येथील श्रीराम मंदिरातून श्रीराम, लक्ष्मण, सीतामायीची पंचधातूची मूर्ती चोरीला गेली होती. मंदिर, राजवाडा यामधून ज्याकाही मूर्ती, दागिणे, तोफा चोरी गेल्यात त्याचा कोठेच शोध लागत नाही.गेल्या दहा वर्षातल्या चोरी आणि घरफोडीच्या ३ हजार ५४५ गुन्ह्यांपैकी अवघ्या २ हजार ४६ गुन्ह्यांचा गुंता पोलिसांनी सोडविला आहे, तर १५ दरोड्यांपैकी ९ गुन्ह्यांतील दरोडेखोरांचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही. जिल्हा पोलीस अधिक्षक श्यामराव दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आलेल्या प्रत्येकी तक्रार नोंदवून घेणे हे कर्तव्यच असल्याने चोरींच्या प्रकरणांचा आकडा वाढता दिसत असल्याचे सबब पुढे केली. मोठया घटनांमध्ये पोलीसांनी तातडीने छडा लावला असुन अनेक दाखले देता येतील. सिंदखेडराजा प्रकरणात तपास योग्य दिशेने सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.