लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने कमी होत असली तरी ती प्रसंगी वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, रविवारी जिल्ह्यात ३४ कोरोना बाधीत आढळून आले. त्यातच ८६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे रुग्णालयात प्रत्यक्षात ५५८ अॅक्टीव्ह (सक्रीय) रुग्णावर उपचार करण्यात येत आहे.रविवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट केलेल्या २८५ जणांचे अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झाले. त्यापैकी २५१ जणांचे अहवाल हे निगेटीव्ह आले तर ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह अहवालामध्ये आडविहीर एक, अंत्री तेली एक, आसलगाव एक, वाडी खुर्द एक, जळगाव जामोद चार, चांडोळ एक, तांदुळवाडी एक, घाटनांद्रा एक, बुलडाणा एक, डोलखेडा एक, देऊळगाव मही ेक, सावंगी तीन, सिंदखेड राजा तीन, दुसरबीड एक, चिखली दोन, मंगरुळ नवघरे एक, दिवठाणा दोन, रानअंत्री एक, मेहकर दोन, देऊळगाव माळी तीन, गुंधा एक, शेगाव एक या प्रमाणे कोरोना बाधीतांचा समावेश आहे.दरम्यान, रविवारी ८६ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये बुलडाणा येतील आयुर्वेदिक महाविद्लायाच्या कोवीड केअर सेंटरमधील १५, चिखली १६, नांदुरा चार, देऊळगाव राजा १४, मेहकर १७, मलकापूर आठ, जळगाव जामोद एक, शेगाव आठ आणि खामगावमधून तीन जणांची सुटी झाली. दरम्यान, आजपर्यंत ३४,२७२ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ७,३९५ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.