- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात व्यापकस्तरावर राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटंब, माझी जबाबदारी’ अभियानात ५६,१२० नागरिक दुर्धर आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे.बुलडाणा जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीत पहिल्या टप्प्यात २६ लाख ६० हजार नागरिकांची घरोघरी जावून तपासणी करण्यात आली. सोबतच त्यांना कोराना संसर्गाच्या संदर्भाने आरोग्य शिक्षण देण्यात आले. त्यामध्ये ही माहिती समोर आली. यासोबतच सारी, आयएलआय या कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या आजारांचेही रुग्ण आढळून आल्याचे सुत्रांनी सांगितले.दरम्यान, या अभियानांतर्गत जिल्ह्यात घरोघरी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल १३ हजार १७८ संदिग्ध रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६४७ व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आल्या होत्या. तसेच अभियानात ताप असलेले व ज्यांच्या शरिरातील ऑक्सीजनचे प्रमाण निकषानुसार कमी आहे, अशा आणि दुर्धर आजार असणार्यांवर अभियानात लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. त्यांच्यावर त्वरीत जवळच्या फिव्हर क्लिनीकमध्ये उपचार करण्यास प्राधान्य दिले गेले होते.
कोरोना पािझिटिव्ह किती?अभियानाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात एकूण ६४७ कोरोना बाधीत व्यक्ती सर्व्हेक्षणादरम्यान आढळून आले. यामध्ये पहिल्या टप्प्यात ५१२ तर दुसऱ्या टप्प्यात १३५ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आल्या. त्यांच्यावर नंतर उपचार झाले.
अभियानात जिल्हा तिसराअभियानातंर्गत अनुषंगीक आँपमध्ये आँनलाईन माहिती भरण्यात जिल्हा राज्यात तिसरा आला आहे. कोल्हापूर, नगर जिल्ह्यानंतर बुलडाणा जिल्ह्याचा यात क्रमांक लागतो. पहिल्या टप्प्यातही बुलडाणा जिल्ह्याने चांगले काम केले आहे.