लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले. बुलडाणा तालुक्यातील सागवन व डोंगरखंडाळा ग्रामपंचायतीच्या एकूण तीन जागेच्या पोटनिवडणुकीसाठी संध्याकाळी ६.३0 वाजेपर्यंत ५७.३३ टक्के मतदान झाले. यावेळी १२0१ पुरुष, तर १0५१ महिला, असे एकूण २२५२ मतदारांनी सहभाग घेतला. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सोमवारी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. बुलडाणा तालुक्यातील सागवन ग्रामपंचायतीचे सदस्य डी.एस.लहाने हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजयी होऊन सदस्य झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे प्रभाग क्रमांक चार च्या रिक्त झालेल्या जागेसाठी २७ मे रोजी मतदान घेण्यात आले. यावेळी गोविंदा तायडे, अँड.दशरथसिंग राजपूत यांच्यात सरळ लढत झाली. यासाठी दोन मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. प्रभाग क्रमांक चारमधील मतदान क्रमांक १ वर २८७ पुरुष व २३८ महिला अशा एकूण ५२५ मतदारांनी सहभाग घेतला. या मतदान केंद्रावर ५४.८६ टक्के मतदान झाले, तर मतदान केंद्र क्रमांक २ वर २१६ पुरुष व २0१ महिला, असे एकूण ४१७ मतदारांनी सहभाग घेतला. या मतदान केंद्रावर संध्याकाळ ६.३0 वाजेपर्यंत ४८.६0 टक्के मतदान झाले. तसेच बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथे २ जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात प्रभाग क्रमांक १ मधील रिक्त जागेसाठी घनश्याम राठोड व तेजराव सावळे यांच्यात सरळ लढत झाली. यावेळी ४१0 पुरुष व ३७२ महिला, असे एकूण ७८२ मतदारांनी सहभाग घेतला. संध्याकाळ ६.३0 वाजेपर्यंत एकूण ७0.२0 टक्के म तदानाची नोंद करण्यात आली. प्रभाग क्रमांक ५ साठी राजू इंगळे व ऋषाली सावळे यांच्यात सरळ लढत झाली. यावेळी २८८ पुरुष व २४0 महिला असे एकूण ५२८ मतदारांनी भाग घेतला. संध्याकाळ ६.३0 वाजेपर्यंत ५२.८५ टक्के मतदान घेण्यात आले. बुलडाणा तालुक्यातील सागवन व डोंगरखंडाळा येथील एकूण तीन जागेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी संध्याकाळी ६.३0 वाजेपर्यंत एकूण ५७.३३ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. सर्वच मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले असून, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. बोराखेडी पोटनिवडणुकीत ५९.६५ टक्के मतदानमोताळा : तालुक्यातील बोराखेडी ग्रामपंचायतीसाठी २७ मे रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत ५९.६५ टक्के मतदान झाले. कुठलाही अनुचित प्रकार न घडता खेळीमेळीच्या वातावरणात शनिवारी शांततेत मतदान पार पडले. यात दोन उमेदवारांचे भाग्य मतपेटीत सील झाले असून, या मतदानाची मोजणी सोमवारी (२९ मे) तहसील कार्यालयात होणार आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार तालुक्यातील १२ गावांतील ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या १८ जागांसाठी पोटनिवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या. यातील चार गावांतील पाच सदस्यांची बिनविरोध निवड, तर एका गावातील एक अर्ज बाद, तसेच सहा गावांत (११ जागा) उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने तेथील निवडणुका न घेता उर्वरित एका (बोरा खेडी) गावात मतदान घेण्यात आले. बोराखेडी ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक तीनमधील एका जागेसाठी यमुना संजय मोरे व मंगला ज्ञानदेव गायकवाड असे दोन उमेदवार नशीब आजमावत आहेत. शनिवारी बोराखेडी येथील मतदान केंद्रावर सकाळी ७:३0 ते संध्याकाळी ६:३0 पर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळी मतदानाला प्रारंभ झाला तेव्हा ११:३0 वाजताच्या सुमारास मतदान केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. दुपारी ३ वाजेनंतर मतदान करण्यास एकच गर्दी झाली. महिला वर्गाची गर्दी लक्ष वेधणारी होती. सायंकाळदरम्यान म तदान केंद्रावर मतदानासाठी रांग लागल्याचे दिसून आले. सायंकाळी ६:३0 वाजता झालेल्या मतदानाच्या एकूण आकडेवारीनुसार ५९.६५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. यात एकूण ६२७ मतदारांपैकी ३७४ मतदारांनी म्हणजेच ५९.६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात एकूण ३१८ पुरुषांपैकी १९४, तर एकूण ३0९ महिलांपैकी १८0 म तदान केले. बोराखेडी परिसर मोठा असल्याने मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. बोराखेडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या निगराणीखाली मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बोराखेडी ग्रा. पं. च्या पोटनिवडणुकीत शनिवारी दोन उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले आहे. मतमोजणी सोमवारी होणार असल्याने दोन्ही उमेदवारांचे लक्ष आता तिकडे लागले आहे. २९ मे रोजी सकाळी १0 वाजेपासून सुरू होणार्या मतगणनेसाठी तहसील कार्यालयात टेबल लावण्यात आले असून, प्रत्येक टेबलावर एक अधिकारी, एक सहायक व एक शिपाई असे कर्मचारी अधिकारी नेमण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी एस.आर. राठोड हे पोटनिवडणुकीची संपूर्ण यंत्रणा हाताळत होते. तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या १८ जागांसाठी पोटनिवडणुक ीची घोषणा झाली. यासाठी पाच गावातील सहा जागांसाठी ११ नामनिर्देशन दाखल झाले होते. सात गावांतील १२ जागा रिक्त राहणारडाभा ग्रा.पं. (एक जागा), खेडी (दोन), तरोडा (तीन), मोहेगाव (दोन), धामणगाव देशमुख (दोन), इब्राहीमपूर (एक) अशा सहा गावांतील ११ जागांसाठी एकही नामांकन दाखल नाही. तसेच सारोळापीर येथील एका जागेसाठी आलेला एकमेव अर्ज छाननीत बाद झाला होता. त्यामुळे या सात गावांतील १२ जागा रिक्तच राहणार आहेत.
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ५७ टक्के मतदान
By admin | Published: May 28, 2017 4:24 AM