पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यातील चार, खामगाव दोन, देऊळगाव राजा दोन, चिखली तेरा, मलकापूर एक, नांदुरा दोन, लोणार एकतीस, जळगाव जामोद तालुक्यातील चार जणांचा समावेश आहे. दरम्यान शेगाव, मेहकर, मोताळा, सिंदखेड राजा आणि संग्रामपूर तालुक्यातील तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण कोरोना बाधित आढळून आला नाही. दुसरीकडे ९६ जणांनी रविवारी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यासोबतच आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ५ लाख ८४ हजार २७० संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले असून कोरोना बाधितांपैकी ८६ हजार १३० जणांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे.
--१२६९ अहवालाची प्रतीक्षा--
तपासणीसाठी घेतलेल्या १ हजार २६९ संदिग्धांच्या अहवालाची अद्यापही प्रतीक्षा आहे. दरम्यान जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ८६ हजार ९४० झाली आहे. रुग्णालयामध्ये सध्या १४७ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.