: किराणा दुकानदार त्रस्तलोकमत न्यूज नेटवर्क मोताळा: स्थानिक आठवडी बाजारातील एका दुकानासमोर तीन ड्रममध्ये ठेवलेले ६०० लिटर खाद्यतेल अज्ञात चोरट्यांनी ३० जुलै रोजी लंपास केले आहे. एकीकडे महागाईचा दर वाढत असतााच खाद्यतेलाचेही भाव वाढले आहे. त्यामुळे चोरट्यांनी खाद्य तेलही चोरण्यास प्रारंभ केल्याचे एकंदरीत चित्र आहे.मुळात मधल्या काळात मोताळा शहरात किराणा दुकानातील साहित्य चोरण्याचा चोरट्यांनी मोठा सपाटा लावला होता. त्यानंतर आता खाद्यतेल चोरी झाले आहे. त्यातच तेलाचे भावही अशात आणखी दहा रुपयांनी वाढल्याने चोरट्यांनी त्यांचा मोर्चा खाद्यतेलाकडे वळविला असल्याचे दिसते. मोताळ्यातील आठवडी बाजारात मोहम्मद नासिर मोहम्मद मंसूर अबला यांचे किराणा दुकान आहे. गुरूवारी मध्यरात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानासमोर ठेवलेले सुमारे ६०० लिटर खाद्यतेल असलेलेले तिन्ही ड्रम लंपास केले. जवळपास ९० हजार रुपये किंमतीचे खाद्यतेल त्यात होते. शुक्रवारी सकाळी ही चोरीची घटना घडकीस आली. प्रकरणी मोहम्मद नासीर मोहम्मद मंसूर अबला यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अशोक रोकडे हे करीत आहेत. या चोरट्यांचाही शोध घेण्याचे आव्हान बोराखेडी पोलिसांसमोर आहे.
मोताळ्यात ६०० लिटर खाद्य तेल चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 11:36 AM