पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात १६, खामगाव १०, शेगाव चार, देऊळगावराजा १, मेहकर एक, नांदुरा एक, लोणार दोन, जळगाव जामोद एक, सिंदखेडराजा पाच आणि संग्रामपूर तालुक्यातील २७ जणांचा यात समावेश आहे. दुसरीकडे चिखली, मलकापूर आणि मोताळा तालुक्यांत तपासणीमध्ये एकही जण कोरोनाबाधित आढळून आला नाही. तसेच रविवारी कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.
दरम्यान, २३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ४८ हजार ३८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, ८५ हजार ४८८ जणांनी कोरोनावर आतापर्यंत मात केली आहे.
--१०८४ अहवालांची प्रतीक्षा--
अद्यापही १ हजार ८४ संदिग्धांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ८६ हजार २७५ झाली आहे. त्यापैकी १३४ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.