लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरासह ग्रामीण भागातील गुणवंतांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधेचा लाभ मिळण्यासाठी केंद्र शासन व आयआयटी सरगपूरच्या सहाय्याने नॅशनल डिजिटल लायब्ररी असे नामकरण असलेल्या ६८ लाख पुस्तकांचे भांडार असलेले पोर्टल सुरू केले आहे.विद्यार्थ्यांना केवळ सुविधांअभावी प्रगतीपासून वंचित राहू नये, म्हणून आवश्यक शैक्षणिक साहित्याचे भांडार मोफत खुले करण्यासाठी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आयआयटी सरगपूरच्या सहाय्याने अथक परिश्रम घेऊन ६८ लाख पुस्तके आॅनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. या पुस्तकांची मोफत डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने शहरासह ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधेचा लाभ मिळणार आहे. दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचे नॅशनल डिजिटल लायब्ररी असे नामकरण करण्यात आले असून, या आॅनलाइन पोर्टलवर उपलब्ध असणारे शैक्षणिक साहित्य लिखित, आॅडिओ तसेच व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध होणार आहे. या सुविधा पूर्णपणे मोफत मिळणार असून यासाठी इंटरनेटवरील ँ३३स्र://ल्ल’ि.्र्र३‘ॅस्र.ंू.्रल्ल या पोर्टलवर लॉगईन करावे लागणार आहे. त्यानंतर संबंधित विद्यार्थी आवश्यक असणारे पुस्तके संगणकावर आॅनलाइन वाचू शकेल किंवा आवश्यक असल्यास डाऊनलोडही करू शकेल. या पुस्तकांचा उपयोग स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशोशिखर गाठणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना होणार आहे.बुलडाणा परिसरातील विद्यार्थ्यांना फायदावाढती बेरोजगारीमुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. पदवी, पदविका असूनही अनेक तरूण नोकरीपासून वंचित आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे; मात्र शैक्षणिक सुविधेअभावी अनेक विद्यार्थी मागे पडतात. यासाठी नॅशनल डिजिटल लायब्ररी उपयुक्त असून, बुलडाणा परिसरातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी या आॅनलाइन पुस्तकांचा लाभ घेत आहेत.नॅशनल डिजिटल लायब्ररी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असून शहरातील अनेक विद्यार्थी या पोर्टलचा लाभ घेत आहेत. -प्रा.शशिकांत जाधव, कादरिया अध्यापक महाविद्यालय तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, बुलडाणा.
विद्यार्थ्यांसाठी ६८ लाख पुस्तकांचे भांडार!
By admin | Published: July 12, 2017 12:53 AM