लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिगाव प्रकल्पामुळे बाधीत रस्ते व पुलांच्या कामासाठी आतापर्यंत ६९५ कोटी १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत असून यातील बहुतांश रस्ते व पुलांची कामे मार्गी लागली आहे. त्यावर आतार्पंत ५७५ कोटी ३६ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत अनुषंगीक माहिती देण्यात आली. जिगावमुळे तीन मोटे पुल व तीन रस्ते प्रामुख्याने बाधीत होत होते. अंतर्गत पोच रस्त्यांनाही यामुळे फटका बसत होता. त्यानुषंगाने गेल्या पाच ते सात वर्षात या रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले होते. अनुषंगीक ही सर्व कामे जवळपास पुर्णत्वास गेली आहे. त्यातील काही रस्ते अल्पावधीतच रहदारीसाठी खुली करण्याच्या दृष्टीने जिगाव प्रकल्प व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशिल असल्याची माहिती सुत्रांनी दिली.प्रामुख्याने नांदुरा-खांडवी- जळगाव जामोद राज्य मार्गावरील पुर्णा नदीवर असलेला पुल, खामगाव-जलंब-भेंडवभल या प्रमुख जिल्हा मार्गावरील भोटा व मस परिसरातील पूल, अंतर्गत पोच रस्ते, शेगाव-वरवट- टुनकी या राज्य मार्ग क्रमांक १७३ वरील खिरोडा येथील पुल व रस्ता तसेच खांडवी-भेंडवळ रस्त, भेंडवळ-वरवट रस्ता, पहुरपूर्णा-भास्तान रस्ता यासह अन्य काही रस्ते तथा छोटे पुल व नाल्यांची कामे करण्यात आली आहे. पुलांसाठी आतापर्यंत ३८५ कोटी २७ लाख रुपयांचा खर्च झाला असून पोच मार्गांसाठी ३०९ कोटी ८३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. बहुतांश कामे अंतिम टप्प्या असून त्यावर ६९५ कोटी १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.
११९ कोटींची कामे बाकीअद्यापही जिगाव प्रकल्पामुळे बाधीत होणारे रस्ते आबाधीत करण्यासाठी जवळपास ११९ कोटी ७४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. यासंदर्भात मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाशी सामंजस्य करारही झाला आहे. त्यानुसार या कामांचे मुल्यांकन करून निधीची तरतूदही करण्यात आली होती. त्यासाठीचा निधीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला असल्याची माहिती दिशा समितीच्या बैठकीत देण्यात आली.