बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील १०५, खामगाव ६२, शेगाव १६, देऊळगाव राजा ४३, चिखली ४५, मेहकर ३४, मलकापूर ७, नांदुरा १८, लोणार १६, मोताळा ३९, जळगाव जामोद ४६, सि. राजा ४६ आणि संग्रामपूर तालुक्यातील १४ जणांचा यात समावेश आहे.
रुग्णालयात उपचारादरम्यान खामगावातील गोपाळनगरमधील ३७ वर्षीय व्यक्ती, पिंप्राळा येथील २९ वर्षीय व्यक्ती, मेहकरमधील आरेगाव येथील ६३ वर्षीय पुरुष, चिखलीमधील सातगाव भुसारी येथील ५० वर्षीय व्यक्ती, नांदुऱ्यातील ४० वर्षीय व्यक्ती शेगावातील ४९ वर्षीय महिला आणि बुलडाणा तालुक्यातील ८४ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे ५०४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
-- ४,६१,७४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह--
आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ४ लाख ६१ हजार ७४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच बाधितांपैकी ७८ हजार ६१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्यापही २ हजार ४९४ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८३ हजार ७३२ झाली असून, त्यापैकी ४ हजार ५३९ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजपर्यंत ५८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.