बुलडाणा: जिल्ह्यात सात कोरोनाबाधितांचा रविवारी मृत्यू झाला असून, ८७२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४,८८९ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४,०१७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील १४६, खामगावमधील ७८, शेगाव ३९, देऊळगाव राजा ४४, चिखली ११०, मेहकर १६०, मलकापूर ३५, नांदुरा २०, लोणार ४०, मोताळा ५३, जळगाव जामोद १००, सिंदखेड राजा तालुक्यात ४७ जण कोरोनाबाधित आढळून आले. संग्रामपूर तालुक्यात तपासणीमध्ये रविवारी एकही जण कोरोनाबाधित आढळून आला नाही. उपचारादरम्यान खामगाव तालुक्यातील माक्ता कोक्ता येथील ४२ वर्षीय पुरुष, खामगाव शहरातील हंसराजनगरमधील ७० वर्षीय महिला, बुलडाणा येथील ३६ वर्षीय व्यक्ती, सागवनमधील ४५ वर्षीय व्यक्ती, मेहकर तालुक्यातील ५५ वर्षीय महिला, जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील ६५ वर्षीय व्यक्ती आणि मेहकर तालुक्यातील नायगाव येथील ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे ८८४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, ४ लाख १५ हजार ९८ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे, तर ७१ हजार ५८४ कोरोनाबाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
--२,७०१ अहवालाची प्रतीक्षा--
रविवारी २ हजार ७०१ संदिग्धांचे अहवाल घेण्यात आले. जिल्ह्यातील एकूण कोरानाबाधितांची संख्या ७७ हजार ९१६ झाली असून, त्यापैकी ५ हजार ८१९ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत ५१३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.