खामगाव (बुलडाणा) : जनुना येथील शेतकर्याच्या मोबाईलवर अज्ञात ठगाने फोन करुन बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून एटीएम क्रमांक घेऊन एटीएम खात्यातून ७३ हजार रुपये काढून फसवणूक केली. ही घटना १0 ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २0१४ चे दरम्यान घडली. याप्रकरणी काल येथील शिवाजी नगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील जनुना येथील शेतकरी भागवत विठोबा उकर्डे वय २८ हे १0 ऑगस्ट रोजी शेतात गेले होते. अज्ञात ठगाने ७0३३0८४११७ या मोबाईल क्रमांकावरुन भागवत यांच्या ८८0५२0३0२४ या क्रमांकावर फोन करुन बँक अधिकारी बोलतो, असे भासवून त्यांच्या एटीएमचा १६ अंकी क्रमांक घेतला व १0 ऑगस्ट ते १६ सप्टेंबर दरम्यान एटीएम खात्यातील ७३ हजार काढून घेतले. ही बाब भागवत उकर्डे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी काल येथील शिवाजी नगर पो.स्टे.ला फिर्याद दिली. यावरुन पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ४२0 भादंविसह कलम ६६ अ,ब, आयटी अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
बँक अधिकारी असल्याचे सांगून एटीएममधून काढले ७३ हजार
By admin | Published: October 30, 2014 11:40 PM