हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दुष्काळावर मात करण्यासह शेती उत् पादनात वाढ करण्यासाठी शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अनुदान पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गंत जिल्ह्यात शेत तळे निर्माण करण्यासाठी ८ कोटी ५४ लाख १४ हजार रुपये अनुदान निधी वाटप करण्यात आला असून, सर्वात जास्त निधी खामगाव उपविभागात ३ कोटी ५८ लाख ४५ हजार रुपये निधी वाटप करण्यात आला आहे. या योजनेमुळे कोरडवाहू शेतकर्यांची सिंचन क्षमता वाढली आहे.जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गंत एकूण पाच हजार शेततळ्यांचे लक्ष्यांक ठेवण्यात आले हो ते. यासाठी आलेल्या ८ हजार ३५८ अर्जातून ३ हजार ९८२ अर्जदार शेतकर्यांना शेततळे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ९४४ शेतकर्यांना शेततळ्याची आखणी करून देण्यात आली; मात्र त्यापैकी २ हजार ९९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. अशा कामे पूर्ण झालेल्या शेतकर्यांना शेततळ्याची अनुदान रक्कम ८ कोटी ५४ लाख १४ हजार रुपये वाटप करण्यात आली आहे. त्यात बुलडाणा तालुक्यात ४७ लाख ४८ हजार रु पये, चिखली तालुक्यात ६३ लाख ७0 हजार, मो ताळा तालुक्यात ७४ लाख ९४ हजार, मलकापूर तालुक्यात ५९ लाख ८ हजार, खामगाव तालुक्यात ९७ लाख ७६ हजार, शेगाव तालुक्यात ७२ लाख २५ हजार, नांदुरा तालुक्यात ५७ लाख ७१ हजार, संग्राम पूर तालुक्यात ७४ हजार ४६ हजार, जळगाव जामोद तालुक्यात ५६ हजार २७ हजार, मेहकर तालुक्यात ५२ लाख २२ हजार, लोणार तालुक्यात ५७ लाख २२ हजार, देऊळगावराजा तालुक्यात ८२ हजार ४१ हजार व सिंदखेडराजा तालुक्यात ५६ लाख १७ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले.
खामगाव उपविभागात ३ कोटी ५८ लाख अनुदान वाटपमागेल त्याला शेततळे अनुदान योजनेंतर्गत सर्वात जास्त अनुदान खामगाव उपविभागात ३ कोटी ५८ लाख ४५ हजार रुपये निधी वाटप करण्यात आले. त्यानंतर मेहकर उपविभागात २ कोटी ४८ लाख २ हजार रुपये, तर बुलडाणा उपविभागात सर्वात कमी २ कोटी ४५ लाख २९ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले.