सिंदखेडराजा: सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात शशिकांत खेडेकर शिवसेना, विनोद वाघ मनसे, गणेश मांटे भाजपा, रेखाताई खेडेकर राष्ट्रवादी, प्रदीप नागरे काँग्रेस, वसंतराव मगर बसपा, पंडितराव खंदारे रिपब्लिकन सेना, संजय डवके, भिमराव थोरवे, नामदेव राठोड, किशोर सरदार, सुरेश म्हस्के यांचा समोवश आहे. तर अर्ज मागे घेणार्यामध्ये संतोष खांडेभराड, अमरदिप देशमुख, रियाजखॉ पठाण, समाधान जाधव, दिनेश घुबे, सुभाष जाधव, अशोक जाधव, आत्माराम शेळके यांचा समावेश आहे.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी उमेदवारी मागे घे तल्यानंतर येथील राष्ट्रवादी कार्यकर्ते सैरभैर झाले होते, माजी जि.प.सभापती रियाजखॉ पठाण यांनी उमेदवारी दाखल करून बंडाचे निशाणही फडकविले होते मात्र आज त्यांनी अर्ज मागे घेतला तसेच डॉ.शिंगणो यांनीही प्रचारात उडी घेतल्यामुळे राष्ट्रवादीमधील वादळ शमले असे दिसत आहे. मनसे, सेना, राष्ट्रवादी व आता प्रथमच रिंगणात असलेली भाजपा यामुळे मतदारसंघात जातीय समिकरणांची आकडेमोड केली जात आहे.
१२ मैदानात, ८ उमेदवारांची माघार
By admin | Published: October 01, 2014 11:54 PM