लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दहावीच्या परिक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला असून बुलडाणा तालुक्याचा निकाल ९१.१६ टक्के लागला आहे. जिल्ह्याने यावर्षी दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्यातील ५४० पैकी ८१ शाळांनी १०० टक्के निकाल देवून जिल्ह्यात अव्वल ठरल्या. तर शून्य टक्के निकालाची बुलडाणा तालुक्यातील एक शाळा आहे. तर जिल्ह्यातील पाच शाळांनी ५० टक्केच्या खाली निकाल दिला.जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील ५४० शाळामध्ये ४० हजार ७९६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४०हजार ६५२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात दहावीची परिक्षा दिली होती. यातून ३५ हजोर ९७२ विद्यार्थी उर्त्तीण झाले. यात बुलडाणा तालुक्यातील सर्वाधिक १५ शाळांनी निकाल १०० टक्के निकाल दिला. यानंतर सिंदखेडराजा व खामगाव तालुक्यातील प्रत्येकी ९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. तर चिखली ७, मेहकर ६, दे.राजा ५, लोणार ४, मोताळा ६, नांदूरा १, मलकापूर २, शेगाव ३, संग्रामपूर ३, ज.जमोद २ अश्या एकून ८१ शाळांनी १०० टक्के निकाल देते जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले. तर बुलडाणा शहरातील गॅस गोडावून नजिकच्या राजश्री शाहू महाराज शाळेचा शून्य टक्के निकाल लागला. या शाळेतून केवळ एकाच विद्यार्थ्यांने परिक्षा दिली होती. तर शेगाव तालुक्यातील चिंचोली येथील श्री संत गजानन विद्यामंदीरचा केवळ १६ टक्के निकाल लागला. तर खामगाव तालुक्यातील १, शेगाव तालुक्यातील ३ व ज.जमोद तालुक्यातील १ शाळेने ५० टक्केपेक्षा कमी निकाल दिला. या निकालाचा पल्ला गाठता आला नाही. यंदाच्या दहावीच्या निकालात जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांनी आपली चांगली प्रगती साधली.