लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात पुन्हा ८१ रुग्ण कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण रुग्ण संख्या एक हजार ७६८ झाली आहे. दरम्यान, गुरूवारी तपासण्यात आलेल्या अहवालापैकी ४४५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.तपासणीदरम्यान प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालापैकी ५९ तर रॅपीड टेस्टमधील २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मलकापूर येथील पाच, चिखली येथील चार, नांदुरा येथील दोन, शेगावमधील १५, खामगावमधील ३०, अमडापूर येथील एक, निपाणा येथील एक, धाडमधील दोन, बुलडाणा येथे तीन, देऊळगाव राजा येथे एक, लोणार तालुक्यातील खळेगाव येथे एक, सुलतानपूर येते चार, सिंदखेड राजा येथे एक, मेहकरमध्ये सहा, जानेफळमध्ये एक, घाटबोरीत एक, भेंडवळमध्ये एक, डोंगरशेवली येथे एक आणि मुळचा नागपूर येथील असलेल्या एकाचा यात समावेश आहे.दरम्यान, २९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये मेहकरमधील दोन, लोणी गवळीमधील दहा, डोणगावमधील सात, लोणारमधील चार, खामगावमधील सहा जणांचा समावेश आहे. दुसरीकडे आजपर्यंत ११ हजार ५३८ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.त्याच प्रमाणे एक हजार १९ बाधीत व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या २०२ अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या जिल्ह्यात ७१४ कोरोना बाधीतांवर उपचार करण्यात येत आहे. आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला. कोरोना बाधीतांची संख्या सध्या वाढत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ८१ पॉझिटिव्ह; ४४५ जणांचे अहवाल निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 11:20 AM