पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहर ७० , बुलडाणा तालुका २१, मोताळा शहर ०३, मोताळा तालुका १८, खामगांव शहर ४२, खामगांव तालुका १२, शेगांव शहर २९, शेगांव तालुका २८, चिखली शहर १६, चिखली तालुका १२, मलकापूर शहर २, मलकापूर तालुका : ०३, दे. राजा शहर ११, दे. राजा तालुका ३७, सिं. राजा शहर ०९, सिं. राजा तालुका २६, मेहकर शहर ११, मेहकर तालुका ४६, संग्रामपूर तालुका २५, जळगांव जामोद शहर १०, जळगांव जामोद तालुका १५, नांदुरा शहर २१, नांदुरा तालुका ०७, लोणार शहर ८, लोणार तालुका ४४ रुग्णांचा समावेश आहे़ आज ८५८ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे़
आतापर्यंत ५१६ जणांचा मृत्यू
आज रोजी २ हजार ५८१ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ४ लाख १९ हजार २१६ आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ७८ हजार ४६६ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ७२ हजार ४४२ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ५ हजार ५०८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच आजपर्यंत ५१६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.