- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शतकोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत बुलडाणा जिल्ह्यात गेल्या चार वर्षात लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी तब्बल ८६ टक्के झाडे जगली असल्याचा दावा सामाजिक वनिकरण विभागाने केला आहे. दरम्यान चालू वर्षी आतापर्यंत ११ लाख २३ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेल्या आठवड्यात सिंदखेड राजा पंचायत समितीमध्ये झालेल्या आढावा बैठकीत सिंदखेड राजा तालुक्यात २ लाखांपेक्षा अधिक झाडे लावल्याचा दावा अधिकाऱ्याने करत बहुतांश झाडे जगल्याचे सांगितले होते. त्यावर प्रत्यक्ष झाडांची पाहणी आपण व्यक्तीश: करणार आहोत. यादी तयार ठेवा असे सुचक वक्तव्य अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले होते. त्या आधारावर गेल्या चार वर्षात जिल्ह्यात झालेल्या वृक्ष लागवडीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता विभागीय वन अधिकारी बी. एन. पायघन यानी ही माहिती दिली. २०१७ पासून ही वृक्ष लागवड योजना सुरू झाली असून यामध्ये २०१७ ते २०२० या कालावधीत २३ लाख ४ हजार ६६८ झाडे लावण्यात आली असून त्यापैकी १९ लाख ७५ हजार ३९६ झाडे जगल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यंदा ८ लाख झाडे लावलीn २०२१ मध्ये आतापर्यंत ८ लाख १७ हजार झाडांचा विनियोग झाला असल्याचे विभागीय वन अधिकारी बी. एन. पायघन म्हणाले. दरम्यान ११ लाख २३ हजार छोटी रोपे व ३ लाख ९८ हजार मोठी रोपे (उंच रोपे) अशी एकूण १५ लाख २१ हजार रोपे उपलब्ध होती. त्यापैकी ३ लाख राेपे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.