बुलडाणा : जिल्ह्यातील ८६ गावांना पावसाळ््यात पुराच्या पाण्याचा धोका असून त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कता बाळगली असून अनुषंगीक बचावाचे साहित्याचीही तयारी पूर्ण केली आहे.नुकत्याच क्षमलेल्या निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात प्रसंग उद्भवल्यास नेमकी काय उपाययोजना केली आहे, याचा आढावा घेतला असता ही माहिती समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने पैनगंगा, खडकपूर्णा आणि पूर्णा या तीन मोठ्या नद्या असून धामना, आमना, नळगंगा, विश्वगंगा, व्याघ्रा, ज्ञानगंगा, मस, मन, तोरणा, बोर्डी आणि वान लहान नद्या आहेत.प्रामुख्याने जिल्ह्यातून वाहनाऱ्या पूर्णा नदीमुळे दरवर्षी नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर, मलकापूर तालुक्यातील काही गावांना फटका बसत असतो. त्यामुळे आंतरजिल्हास्तरावर जलसंपदा विभागामध्ये त्यादृष्टीने समन्वय राखण्याची गरज आहे. पुर्णा नदीला अगदी अमरावतीमध्येही पाऊस पडला तरी पुर येतो. त्यामुळे पुर्णा नदीकाठच्या जिल्ह्यातील गावांना पावसाळत नेहमीच वेढा पडण्याची भिती असते. २००६ मध्ये अतिवृष्टीदरम्यान पुर्णानदीच्या रौद्ररुपामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यातच पुर्णा नदीच्या उपनद्यांमधील पाणीही पुर्णा नदीत न सामावल्या गेल्यामुळे त्याचा फटका अन्य गावांनाही बसला होता. या पार्श्वभूमीवर जुना अनुभव पाहता आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळतील संभाव्य आपत्कालीन स्थितीच्या दृष्टीने पूर्वतयारी केली आहे. पट्टीचे पोहणारे, आपत्कालीन स्थितीमध्ये आवश्क असलेले सर्च लाईट व साहित्य उपलब्ध करून आढावाही घेतला आहे. (प्रतिनिधी)या गावांना असतो पावसाळ््यात पुराचा धोकापुर्णा नदी व तिच्या उपनद्यांमुळे नदीकाठच्या नांदुरा तालुक्यातील २२, जळगाव जामोद मधील आठ, संग्रामपूरमधील पाच गावांना धोका असतो. यात प्रामुख्याने खेडगाव, पिंप्री कोळी, ईसरखेड, टाकळी वतपाळ, हिंगणे गव्हाड, येरळी, बेलाड, खरकंडी, दादगाव, रोटी, हिंगणे दादगाव, भोटा, पळसोडा, पातोंडा, सावरगाव, वडगाव दिघी, वडी, मामुलवाडी, आस्वंद, भोन, पेसोडा, इटखेड, सावली, आडगाव बु. माहुली, पळशी वैद्य, पळशी भाट, हिंगणे बाळापूर, दादुलगाव जुने, माणेगाव, गोळेगाव बु. माहुली या गावांचा पुराचा धोका असतो. शेगावात दहा, मेहकरमध्ये १२ गावांनाही पुराचा धोका आहे.पुरामुळे पाच वर्षात १२ जणांचा मृत्यूबुलडाणा जिल्ह्यात पुरामुळे मृत्यू पावलेल्यांचीही माहितीही संकलीत केली आहे. गेल्या पाच वर्षात १२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. २०१५ मध्ये तीन, २०१६ मध्ये दोन, २०१८ मध्ये एक आणि २०१९ मध्ये सहा व्यक्तींचा अशा एकूण १२ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे.जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांवरील यंत्रणाही जलसंपदा विभागाने पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर तपासली असून प्रकल्पनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रकल्पावरील संदेश वहनाच्या राहित्याचीही तपासणी करून घेण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले.
बुलडाणा जिल्ह्यातील ८६ गावांना पुरामुळे धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 12:39 PM