लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस होत आहे. आतापर्यंत सरासरीच्या ८७ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्याची सरासरी ७६१.६ मिमी असून, २१ सप्टेंबरपर्यंत ६६७ मिमी पाऊस झाला आहे.
यावर्षी जून महिन्यामध्ये जिल्ह्यात सरासरीच्या कमी पाऊस झाला. त्यामुळे या महिन्यात पेरण्या रखडल्या. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीच्या कमी पाऊस झाला, तर सप्टेंबर महिन्यामध्ये जोरदार पाऊस होत आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात गत आठ दिवसांपासून पाऊस होत आहे. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावला आहे.
शेगाव तालुक्यात काही भागात शेतात पाणी साचले असल्याने पिके पिवळी पडली आहेत. शेतातील मातीही वाहून गेली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस बुलडाणा जिल्ह्यात झाला असून १०३.६७ टक्के झाला आहे तर सर्वात कमी पाऊस लोणार तालुक्यात ७०.६२ टक्के झाला आहे. देऊळगाव राजा तालुक्यात १०० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील घाटाखालील जळगाव जामोद तालुक्यात ७४.७२ टक्के, मलकापूर तालुक्यात ७६.०६ टक्के, नांदुरा तालुक्यात ८१.९४ टक्के, शेगाव तालुक्यात ९१.९४ टक्के तर खामगाव तालुक्यात ८३.५५ टक्के पाऊस झाला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील पाऊस
तालुका - पाऊस (टक्के)
बुलडाणा - १०३.६७चिखली - ८९.४५देऊळगाव राजा - १००.८६सिंदखेड राजा - ९८.३७लोणार - ७०.६२मेहकर - ८८.९८खामगाव - ८३.५५शेगाव - ९१.९४मलकापूर - ७६.०६नांदुरा - ८१.९४मोताळा - ८१.०८संग्रामपूर - ९५.६५जळगाव-जामोद - ७४.७२