- विठ्ठल देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कराहेरी बुद्रुक : सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगाव फाट्यावर १३ जणांचा जीव घेणाऱ्या यमाच्या तावडीडून ९ वर्षांची चिमुकली बचावली आहे. काळाने तिच्यावरही झडप घालण्याचा प्रयत्न केला; पण तिची वेळ आली नव्हती, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र, प्रत्यक्ष संपूर्ण घटनाक्रम बघणारी ही चिमुकली अत्यंत भेदरलेली आहे. त्यामुळे काय बोलावे हेही तिला सुचत नव्हते.
छबू गावड, असे या चिमुकलीचे नाव आहे. समृद्धी महामार्गाच्या साखळी क्रमांक ३१९ वरून परत येत असताना ही चिमुकली टिप्पर चालकाच्या सोबत केबिनमध्ये बसलेली होती. समोरून येणाऱ्या वाहनाला साइड देण्यासाठी टिप्पर चालक त्याचे वाहन बाजूला घेत असतानाच अपघाताची जाणीव होताच त्याने छबूला धक्का देत केबिनमधून बाहेर लोटल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पावसामुळे रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर तरोटा आणि गाजर गवत उगवलेले आहे. त्यावर अलगद ही चिमकुली फेकली गेली व दैव बलवत्तर म्हणून ती बचावली.चालकही बचावलाया घटना क्रमादरम्यान चालकही थोडक्यात बचावला आहे. छबूला केबिनमधून बाहेर ढकलत तोही बाहेर पडला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य पाहता त्यानेही अपघातातील जखमींसोबत जालना गाठले असल्याची माहिती आहे. विवेक राॅय असे या वाहन चालकाचे नाव आहे. ३० वर्षीय विवेक राॅय हा उत्तर प्रदेश मधील रहिवासी आहे. रात्री १०.२० वाजता त्याला किनगावराजा पाेलीस ठाण्यात आणण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.