लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : तालुक्यातील विविध ठिकाणी विकास कामे सुरु असून, आणखी काही कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन तालु क्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी स्थानिक बाजार समितीमध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, बाजार समिती सभापती शिव पाटील तेजनकर, संचालक संतोष मापारी, विठ्ठल घायाळ, प्रकाश महाराज मुंढे, डॉ. अनिल मापारी, शहर प्रमुख पांडुरंग सरकटे उपस्थित होते. माहिती देताना आ. रायमुलकर म्हणाले की, ९३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यामध्ये प्रामुख्याने दुर्गा टेकडी परिसरातील जागेमध्ये पर्यटक सुविधा केंद्र, तारांगण, संरक्षक भिंत, परिसरा तील मुख्य रस्त्याला जोडणारे रस्ते, संग्रहालय यासाठी १४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पर्यटन विभागामार्फत लोणार शहरातील चौकाचे सुशोभिकरण आणि सौंदर्यीकरण करत रस्त्याच्यामध्ये दुभाजक बसविण्यात येणार आहे. तसेच पर्यावरण खात्यांतर्गत शहरातील लेंडी तलावाचे सुशोभिकरण व सौंदर्यीकरणासाठी २ कोटी ९0 लाख रुपयांचा निधी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडून खेचून आणला आहे. तसेच तीर्थक्षेत्र व पालखी मार्गाकरिता किनगावजट्ट ते लोणी सखाराम महाराज रस्त्याकरिता ४0 किमीसाठी ९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करत लवकरच कामास सुरुवात केली जाणार असल्याचे ते म्हणाले.लोणार तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण अहोरात्र झटत असून, येत्या काही दिवसात लोणार बसस्थानकासाठी मंजूर झालेल्या १ कोटी रुपयांची कामे त्वरित सुरु होणार आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्म सहीत बसस्थानकाचे चालक-वाहक विश्रां ती कक्ष, संडास, बाथरुम सहीत अद्ययावत बसस्थानक करण्याचा मानस आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी व्यक्त केला आहे.
लोणार तालुका विकास आराखड्यासाठी ९३ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:34 AM
लोणार : तालुक्यातील विविध ठिकाणी विकास कामे सुरु असून, आणखी काही कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन तालु क्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी स्थानिक बाजार समितीमध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.
ठळक मुद्देतालुक्याचा चेहरा बदलणार - रायमुलकर