बुलडाणा : स्टेट को-आॅप. हाऊसिंग फायनांस कॉर्पाेरेशनच्या १४ संचालकांच्या जागेसाठी राज्यात एक जुलै रोजी मतदान घेण्यात आले. दरम्यान, या निवडणुकीत दोन पॅनल उभे असून पुणे व नाशिक विभागात सर्व साधारण मतदार संघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. दुसरीकडे अमरावती विभागातून यामध्ये दोन सदस्य निवडून द्यावयाचे असून त्यासाठी रिंगणात चार उमेदवार उभे ठाकले आहे. बुलडाणा जिल्ह्यात सरासरी ९३.३३ टक्के मतदान झाले आहे. सर्वसाधारण मतदार संघात मुंबईतून दोन, औरंगाबाद मधून चार, नागपूर मधून दोन, अमरावती विभागातून दोन संचालक निवडून द्यावयाचे आहेत. दरम्यान, सर्व विभागातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या मतदार सघांतून एक, ओबीसी मतदार संघातून एक आणि महिला राखीव मतदार संघातून दोन संचालक निवडून द्यावयाचे आहेत. आगामी पंचवार्षिकसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने ही निवडणूक होत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (पुणे) यांनी २६ जून रोजीच्या आदेशान्वये राज्यातील संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा उपनिबंधक यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यानुषंगाने एक जुलै रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान यासाठी मतदान घेण्यात आले. बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती या पाचही जिल्ह्यातील गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या पदाधिकार्यांना मतदानाचा अधिकार आहे. सोबतच वैयक्तिक सभासदही यात मतदार आहेत. त्यानुषंगाने अमरावती विभागात २२७ मतदार असून यात बुलडाणा जिल्ह्यात १५, अमरावती जिल्ह्यात १२५, यवतमाळ जिल्ह्यात ४१, अकोला जिल्ह्यात १३ आणि वाशिम जिल्ह्यात ३३ मतदार आहेत. दुसरीकडे बुलाडणा जिल्ह्यात १५ पैकी १४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्हत ९३.३३ टक्के मतदान झाले आहेत. सर्व साधारण गटात दुहेरी लढत अमरावती विभागात सर्वसाधारण मतदार संघात योगेश देशमुख, रविंद्र गायगोले आणि दीपक कोरपे, अजय पाटील यांच्यात लढत होत आहे. ओबीसी मतदार संघात वसंतराव घुईखेडकर, वसंतराव पंढरीनाथ तोरणे यांच्यात लढत होत आहे. महिला राखीव मतदार संघाच्या दोन जागांसाठी स्नेहा अंबरे, शैलजा लोटके, जयश्री पाटील, संजीवनी सिसोदे आणि अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून बालाजी अवटे, उत्तमराव शिंदे, निशा सोनवणे यांच्यात लढत असून त्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे.
हाऊसिंग फायनान्स कॉर्पाेरेशन निवडणुकीत ९३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 6:37 PM
बुलडाणा : स्टेट को-आॅप. हाऊसिंग फायनांस कॉर्पाेरेशनच्या १४ संचालकांच्या जागेसाठी राज्यात एक जुलै रोजी मतदान घेण्यात आले.
ठळक मुद्देनिवडणुकीत दोन पॅनल उभे असून पुणे व नाशिक विभागात सर्व साधारण मतदार संघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अमरावती विभागातून यामध्ये दोन सदस्य निवडून द्यावयाचे असून त्यासाठी रिंगणात चार उमेदवार उभे ठाकले आहे. मुंबईतून दोन, औरंगाबाद मधून चार, नागपूर मधून दोन, अमरावती विभागातून दोन संचालक निवडून द्यावयाचे आहेत.