लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गुरूवारी तपासणी करण्यात आलेल्या १०२५ संदिग्धांच्या अहवालापैकी ९५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून ९३० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, ७८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता १० हजार १२२ झाली आहे.गुरूवारी ९५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये शेगाव तीन, पाळा एक, जळगाव जामोद एक, वाडी खुर्द दोन, आसलगाव दोन, सताळी १९, वडशिंगी तीन, टाकली पाटण १४, नांदुरा एक, अंबोडा एक, पोटळी एक, पिंपळखुटा दोन, गायखेड एक, बुलडाणा चार, अमडापूर दोन, मलकापूर एक, शेंदुर्जन तीन, महारखेड चार, सिंदखेड राजा तीन, वकाना एक, संग्रामपूर पाच, नागझरी एक, गायगाव दोन, पहुरजीरा एक, तिंत्रव एक, पिंपळगाव एक, सावखेड भोई एक, मेहुणा राजा एक, देऊळगाव राजा एक, लोणार तीन, डोणगाव चार, आरेगाव एक, मेहकर दोन, रुईखेड मायांबा येथील एकाचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान सोमवारी ७८ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये बुलडाणा कोवीड केअर सेंटरमधील एक, मेहकर आठ, देऊळगाव राजा आठ, नांदुरा १४, सिंदखेड राजा २८, शेगाव चार, खामगाव एक, जळगाव जामोद सहा, मोताळा एक, मलकापूर सात या प्रमाणे मात केलेल्या रुग्णांना सुटी देण्यात आली.
बुलडाणा जिल्ह्यात ९५ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 11:32 AM