शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
4
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
5
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
6
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
7
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
8
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
9
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
10
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
11
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
12
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
13
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
14
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
15
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
16
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
17
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
18
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
19
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
20
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO

बुलडाणा जिल्ह्यात डिसेंबरमध्ये ९,५३७ मालमत्तांचे व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 10:56 IST

Property transactions in Buldana district : जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत.

ठळक मुद्दे१ सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कामध्ये  ही सूट देण्यात आली होती. ३२ कोटी ३१ लाख ७३ हजार ४४५ रुपयांची या विविध व्यवहारांपोटी उलाढाल झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : मुद्रांक शुल्कामध्ये १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत देण्यात आलेली तीन टक्के सूट पाहता या कालावधीत जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. डिसेंबर महिन्यात ९,५३७ व्यवहार झाले.एकट्या डिसेंबर महिन्याचा विचार करता डिसेंबर २०१९ मधील व्यवहाराच्या तुलनेत दुपटीने मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत वाढ झाली आहे. १ सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कामध्ये  ही सूट देण्यात आली होती.  तेव्हापासून ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात ३२ कोटी ३१ लाख ७३ हजार ४४५ रुपयांची या विविध व्यवहारांपोटी उलाढाल झाली. २०१९ मधील सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांत २६ कोटी ४२ लाख ६१ हजार ३५० रुपयांची उलाढाल झाली होती. पूर्वी मुद्रांक शुल्काचा दर अधिक होता. त्यामुळे व्यवहारांची संख्या कमी होती. मात्र आता मुद्रांक शुल्कामध्ये सूट देण्यात आल्याने  दस्त नोंदणीचे प्रमाण वाढले असून मालमत्ता खरेदी, गहाण खत, बक्षीसपत्र, हस्तांतरण, हक्क सोडपत्र व्यवहारांचा यात समावेश आहे. बक्षीसपत्रांचे प्रमाणही त्यामुळे वाढले असून रक्ताच्या नात्यातील रखडलेल्या व्यवहारांनीही यात वेग घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात ४,५९५ व्यवहार झाले तर ऑक्टोबरमध्ये ४,४७८, नोव्हेंबरमध्ये ४,९०१ आणि डिसेंबरमध्ये ९,५३७ व्यवहार झाले. चारही महिन्यांचा विचार करता २३ हजार ५११ मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. दरम्यान, ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन चलान भरल्यास ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये सूट मिळणार आहे. त्याअनुषंगाने रखडलेले व्यवहार करण्यासाठी नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी गर्दी केलेली होती. 

चार महिन्यांत ३२ कोटींची झाली उलाढाल  जिल्ह्यात चार महिन्यांत ३२ कोटी ३१ लाख ७३ हजार ४४५ रुपयांची मालमत्तांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून उलाढाल झाली. ती महिन्यात सर्वाधिक  १२ कोटी ३२ लाख ५४ हजार रुपये एवढी होती.  नोंदणी फीपोटी ९ कोटी ९४ लाख २८ हजार ७६५ रुपयांचा महसूल शासनास मिळाला आहे. गेल्या वर्षी शेवटच्या चार महिन्यांत पाच कोटी ५७ लाख ५७ हजार ३८५ रुपये नोंदणी फीपोटी मिळाले होते.  चार महिन्यांत ९० टक्क्यांनी व्यवहार वाढले  आहेत. मुद्रांकापोटी डिसेंबर २०२० मध्ये ८ कोटी ८५ लाख ४५ हजार २३५ रुपयांचा महसूल मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुद्रांक शुल्कापोटी सात टक्के अधिकचा महसूल शासनास मिळाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना...कोरोना संसर्गाचा काळ पाहता अनुषंगिक उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. मास्क लावणे, शारीरिक अंतर पाळण्यावर भर दिला गेला होता.  डिसेंबर महिन्यात दुय्यम निबंधक कार्यालयात वाढलेली गर्दी पाहता अनुषंगिक सूचना दिल्या गेल्या होत्या.

कामे गतिमान करण्यास प्राधान्य देण्यात येत असून आता इंटरनेट सुविधेचाही वेग वाढविण्यासाठी खासगी जोडणीचा आधार घेऊन कामाचा वेग वाढविण्यास प्राधान्य राहणार आहे. शासनाने दिलेल्या या सवलतीमुळे जिल्ह्यातील मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार जवळपास दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठीही आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.         - नितीन शिंदे, जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी

टॅग्स :buldhanaबुलडाणाRevenue Departmentमहसूल विभाग