मलकापूर : इयत्ता १० वी च्या परिक्षेचा निकाल दुपारी बोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला असून यामध्ये मलकापूर तालुक्यातील परिक्षेला बसलेले २७०१ विद्यार्थ्यापैकी २४५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने या तालुक्याचा एकंदर निकाल हा ९०.९६ टक्के लागला आहे. निकालात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यामध्ये व त्यांच्या पालकांमध्ये आनंद व्यक्त होताना दिसून आला.तालुक्यात एकूण २४ शाळा असून यामधील भारत भारती कॉन्व्हेंट व विद्या विकास विद्यालय वाकोडी या दोन शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. तर दाताळा शिक्षण समिती दाताळा ८५.९९, गोविंदा विष्णू महाजन विद्यालय ९४.६२ म्युनिसिपल हायअर सेकंडरी हायस्कूल ७५.६२, झकारीया उर्दू हायस्कूल ९१.१३, हिराबाई संचेती कन्या शाळा ९२.३०, नुतन विद्यालय ९६.६६, यशवंत संचेती कन्या शाळा ९२.३०, नुतन विद्यालय ९६.६६, यशवंत विद्यालय वडजी ९८.१८, विवेकानंद विद्यालय नरवेल ७५.५५, मोतीलाल संचेती विद्यालय देवधाबा ७७.६५, जिवन विकास विद्यालय दुधलगाव ८५.२९, जि.प.हायस्कूल मलकापूर ९१.३०, व्ही.एन.लाहुडकर विद्यालय दसरखेड ७१.७३, ग्रामीण विकास विद्यालय बेलाड ९७.९७, उर्दू गर्ल्स हायस्कूल मलकापूर ९८.०७, आदर्श व्यिालय उमाळी ८१.६९, स्व.आबासाहेब देशमुख विद्या वडोदा ८६.३६, मौलाना अब्दुल कलाम विद्यालय ८१.३७, नुतन विद्यालय निमखेड ८४.२१, अली अलाना उर्दू हायस्कूल ८५.८९, लक्ष्मी विद्यालय म्हैसवाडी ८१.०८ टक्क असा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे.
मलकापूर तालुक्याचा ९०.९६ टक्के निकाल
By admin | Published: June 14, 2017 1:49 AM