शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

गव्हाची एक कोटींची रक्कम थकवून व्यापाऱ्याची फसवणूक, गुन्हा दाखल 

By अनिल गवई | Published: January 14, 2023 6:00 PM

गव्हाची एक कोटींची रक्कम थकवून व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खामगाव (बुलडाणा) : गहू खरेदी केल्यानंतर गव्हाची रक्कम देण्यात सातत्याने टाळाटाळ करणाऱ्या अकोट येथील व्यावसायिकाविरोधात अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तब्बल एक कोटी चार लाख रुपयांच्या फसवणुकीमुळे खामगावातील व्यापारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. खामगाव येथील व्यावसायिक मनोहर रेतूमल नथ्थानी (६७, रा. सिंधी कॉलनी, झुलेलाल नगर) यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांच्या मालकीचे मनशा ट्रेडर्स आहे.

या ट्रेडर्सच्या माध्यमातून ते व्यापाऱ्यांना आणि पीठ गिरणी मालकांना गहू विकतात. दरम्यान, अकोट येथील पुरूषोत्तम मोहनलाल तापडीया (५८) यांनी नथ्थानी यांच्याकडून वेळोवेळी एक कोटी ८९ लाख २६ हजार ५७६ रुपयांचा गहू खरेदी केला. या व्यवहारापोटी तापडीया यांनी ८४ लाख ४४ हजार ३११ रुपये अदा केले.  मात्र, उर्वरीत एक कोटी ४ लाख ८२ हजार ५७६ रुपयांची रक्कम देण्यास सतत टाळाटाळ केली. ठराविक मुदतीत ही रक्कम न अदा केल्यामुळे तापडीया यांनी आपली फसवणूक केली, अशी खात्री पटल्याने मनोहर नथ्थानी यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणी नथ्थानी यांच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी तापडीया यांच्याविरोधात भादंवि कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक पंकज सपकाळे करीत आहेत.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस