लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: ज्ञानगंगा अभयारण्यातील खामगाव वन्यजीव परीक्षेत्रामधील गेरू बिटमध्ये अवैध रित्या मेंढ्या चराई करणार्यास दहा हजाराचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध शेळी मेंढ्या चराई करणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, ज्ञानगंगा अभयारण्यातील गेरू िबट कक्ष क्रमांक २२५ मध्ये सामुहिक गस्तीदरम्यान नांदी येथील पांडू वामन हटकर हा अवैध मेढ्या चराई करताना आढळून आला. त्याच्या िवरोधात भारतीय वनअधिनियम १९७२ चे कलम २७, २९ नुसार वन गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपीला दहा हजारांचा दंडही ठोठावण्यात आला. ही कारवाई विभागीय वनअधिकारी अ. वा. निमजे, सहा. वनसंरक्षक सी. एम. राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. सी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनात वनपाल एस. आर. भिसे, वनरक्षक एम. के. ताठे यांनी ही कारवाई केली.