खामगाव: भरधाव प्रवासी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात एक जण जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. बुधवारी दुपारी ही घटना खामगाव बुलढाणा रस्त्यावरील बोथा घाटातील चिंच पॐाट्यावर घडली. याप्रकरणी िहवरखेड पोलीसांनी प्रवासी वाहनाच्या चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरखंडाळा येथील प्रकाश रामप्रसाद सावळे ३८ संदीप ईश्वरलाल धामणे ३८ आपल्या सहकार्यासह एमएच २८ एडी ९६६५ या क्रमांकाच्या दुचाकीने खामगावकडे जात होते. दरम्यान, एमएच २९ एआर ०३६० या क्रमांकाच्या भरधाव वेगाने येत असलेल्या प्रवासी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील धामणे हा जागीच ठार झाला. तर दुचाकीवरील दुसरा इसम गंभीर जखमी झाला. जखमी इसमाला उपचारार्थ बुलढाणा येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी प्रविण ईश्वरलाल धामणे ४१ रा. डोंगर खंडाळा ता. बुलढाणा यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रवासी वाहन चालकांविरोधात भादंवि कलम ३०४अ, २७९, ३३७, ३३८, ४२७ सहकलम १८४, १३४,१७७ मोटार वाहन अधिनियमान्वये बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.