शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
2
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
3
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
4
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा
5
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
6
पाकिस्तानात 8 वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; पॅसेंजर वाहनावर ओपन फायरिंग, 39 जणांचा मृत्यू
7
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
8
अदानी ग्रुपचे शेअर्स घरसल्याने LICला मोठा धक्का; तब्बल १२ हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज
9
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
10
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
11
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
12
Shah Rukh Khan : शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीबाबत खळबळजनक खुलासा
13
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
14
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
15
Kalbhairav Jayanti 2024: कालभैरव जयंतीला 'हे' तोडगे करा आणि संसार तापातून मुक्त व्हा!
16
'धूम २'मध्ये ऐश्वर्या राय बच्चनने हृतिक रोशनसोबत दिला होता किसिंग सीन, याबद्दल अभिनेत्री म्हणाली....
17
कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान
18
Ration Card धारकांसाठी मोठी बातमी! ५.८ कोटी शिधापत्रिका होणार रद्द; तुमचं नाव तर यात नाही ना?
19
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
20
अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग चर्चेत, म्हणाले, "मी माझ्या कुटुंबाविषयी क्वचितच बोलतो कारण..."

समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात भरधाव कार ट्रकवर जोरात आदळली, तीन ठार, दोन जखमी

By संदीप वानखेडे | Published: October 31, 2024 2:31 PM

मलकापूर पांग्रा विभागाजवळ झाला मोठा अपघात; ट्रक चालक खाजा शेख पाेलिसांच्या ताब्यात

संदीप वानखडे, मलकापूर पांग्रा, बुलढाणा: समृद्धी महामार्गावर भरधाव कार ट्रकवर आदळल्याने एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर दाेन जण जखमी झाले़ ही घटना ३१ ऑक्टाेबर राेजी मलकापूर पांग्राजवळ घडली. राजेश दाभाडे (वय ४२),शुभांगी दाभाडे (वय ३२) आणि रियांश राजेश दाभाडे (वय ४) अशी मृतकांची नावे आहेत.

पुणे येथील राजेश दाभाडे यांचे कुटुंब कार क्रमांक एएमच १७ एजे ९१७३ ने अमरावतीकडे हाेत हाेते़ दरम्यान, समृद्धी महामार्गावर चॅनेल क्रमांक ३३४़ ६०० नागपूर काॅरीडाेअवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रक क्रमांक एमएच २१ बीएच ५९७६ वर आदळली़ ही धडक एवढी भीषण हाेती की, यामध्ये शुभांगी दाभाडे व राजेश दाभाडे हे जागीच ठार झाले़ तसेच रियांश राजेश दाभाडे या चिमुकल्याला सिंदखेड राजा येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

कारमधील समीक्षा राजेश दाभाडे व कार चालक आश्विन धनवरकर हे किरकोळ जखमी झाले आहे़ त्यांना रुग्णवाहिकेमध्ये औषधोपचार देण्यात आला आहे. ट्रक चालक खाजा शेख (रा. जालना याला सिंदखेडराजा) पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली. जखमींना सिंदखेड राजा व दूसरबीड येथील १०८ रुग्णवाहिकेमधून डॉ. अक्षय विघ्ने, डॉ. वैभव बोराडे चालक शैलेश दळी ,दिगांबर शिंदे यांनि उपचार करत सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात हलवले. यावेळी बचाव कार्यामध्ये पीएसआय पवार, पोहेका राठोड, पोकॉ किरके, एमएसएफ स्टाफ सिंदखेड राजा नाईक, पाटील यांनी सहकार्य केले.

दाभाडे कुटुंबावर शाेककळा

दिवाळीच्या पर्वात राजेश दाभाडे यांच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर शाेककळा पसरली आहे. या अपघात दाभाडे कुटुंबातील पाच वर्षीय बालिका समीक्षा दाभाडे हीच बचावली आहे.

टॅग्स :AccidentअपघातbuldhanaबुलडाणाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग