खामगाव: वाघाच्या हल्ल्यात मेंढ्यासह ६५ कोकरे ठार झाली. खामगाव तालुक्यातील हिवरखेड शिवारात पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वन आणि महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, खामगाव तालुक्यातील हिवरखेड शिवारात गुरूवारी पहाटे एका चवताळलेल्या वन्यजीवाने अक्षरक्ष: धुमाकुळ घातला. मेंढपाळांच्या मेंढ्याच्या कळपात घुसून नवजात कोकरे, लहान मोठ्या मेंढ्यासह ६५ जनावरांचा बळी घेतला. आणखी काही जनावरे गायब असल्याचा प्राथमिक अंदाज मेंढपाळांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती िमळताच तलाठी, ग्रामसेवक आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
मेंढपाळाचे मोठे नुकसानचवताळलेल्या वन्यजीवाने काही समजण्याच्या आतच मेंढयाच्या विविध कळपांमध्ये घुसून मेंढ्यांवर हल्ला केला. ३५ ते ४० कोकरे आणि २५ लहान मोठ्या मेंढ्या मारल्या. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, हल्ला करणारे जनावर हे वाघ की बिबट याबाबत घटनास्थळी मतभिन्नता दिसून आली. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतरच या प्रकरणी उलगडा होण्याची शक्यता आहे.
अशी मारली मेंढपाळांची जनावरेकौतिक हटकर : १७मुरलीधर कोळपे: ११दादाराव कोळपे: १२कासम पारखे: १०दशरथ कोळपे: १०वामन हटकर: ०५