आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही होते. आतापर्यंत जिल्ह्यात योजनेंतर्गत १ लाख ७८ हजार ६८३ शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकासह याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. यापैकी एक लाख ७० हजार ५७६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे. उर्वरित ८ हजार १०६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेले असून अद्यापही आधार प्रमाणीकरण केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी महा ई-सेवा केंद्र किंवा ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता योग्य खबरदारी घेऊन आधार प्रमाणीकरण करावे, असा सूचना जिल्हा उपनिबंधक यांनी केल्या आहेत. हे आधार प्रमाणीकरण संबंधितांनी तत्काळ करावे असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कर्जमुक्तीच्या यादीमधील जे शेतकरी मयत आहेत, अशा शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचे वारसाने संबंधित बँकेमध्ये जाऊन त्यांची कर्जखात्यात वारस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करून घेणेही आवश्यक असल्याचे चव्हाण म्हणाले.
८ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:52 AM