जळगाव जामोद: शेतातील दरोड्याप्रकरणी गेल्या १८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी जळगाव जामोद पोलिसांनी ४ सप्टेंबरच्या रात्री अटक केली. या प्रकरणी एक आरोपी अद्यापही फरार आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार जळगाव जामोद येथील सत्यनारायण जयनारायण राठी यांच्या खेर्डा परिसरातील शेता मध्ये १४ फेब्रुवारी १९९६ रोजी १६ दरोडेखोरांनी डाका टाकला होता. यावेळी शेतातील रखवालदारास कुर्हाडीने जखमी करून शेतातील सहा पोते तूर चोरून नेली होती. याप्रकरणी सत्यनारायण राठी यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी सर्व १६ आरोपींविरूद्ध कलम ३९५ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे यातील १३ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, तीन दरोडेखोर अद्यापही फरार होते. घटनेला १८ वर्ष उलटूनही या आरो पींचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, आरोपीच्या शोधार्थ ठाणेदार भोंगे यांनी एक पथक नेमून शालीग्राम भाउजा निहान (सोनबर्डी) याला एप्रिल महिन्यात अटक केली होती. तर भुया मोतीराम जामुनकर (निहाल) सोनबर्डी याला ४ सप्टेंबर रोजी जामोद -सुनगांव मार्गावरून अटक करण्यात आली. या पथकामध्ये एएसआय भगवान राठोड, पोकाँ रिजवान शेख, सुनिल राठोड यांचा समावेश असून या प्रकरणातील तिसरा आरोपी रावजी तुमला निहाल अद्यापही फरार आहे.
फरार आरोपीस अटक
By admin | Published: September 07, 2014 12:30 AM