बुलडाणा : जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना कारागृहातून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना गुरुवारी यश आले. सन २००६ मध्ये अनिस खान दिलावर खान याने त्याच्या पत्नीचा खून केलेला होता. त्यावरून पो.स्टे. बोराखेडी येथे कलम ३०२, ३०४ ब, ४९८ अ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी नामे अनिस खान दिलावर खान रा. कोथळी यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच तो कारागृहामधून अभिवचन रजेवरून फरार असल्यामुळे त्याच्याविरुद्ध पो.स्टे. बोराखेडी कलम २२४ भादंविप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.अनिस खान दिलावर खान मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरवरून वाघजाळ फाटा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा, अपर पोलीस अधीक्षक डोईफोडे व प्रताप शिकारे, पोलीस निरीक्षक स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विनायक कारेगावकर पो.हे.काँ. केशव नागरे, ना.पो.काँ. नंदकिशोर धांडे, दीपक पवार, गजानन अहेर, पो.काँ. प्रवीण पडोळ व चापोकाँ सुभाष साळोख यांनी सदर आरोपीस वाघजाळ फाटा येथे शिताफीने ताब्यात घेतले व पुढील कार्यवाहीकरिता पो.स्टे. बोराखेडी येथे हजर केले आहे.
फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
By admin | Published: July 07, 2017 12:16 AM