शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

पालिकेच्या जंगम मालमत्ता जप्तीची नामुष्की टळली, थकीत देयकासाठी न्यायालयाने काढले होते जप्ती वॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 6:39 PM

मालमत्ता कर आकारणी आणि संगणकीकरणाच्या कामाचे थकीत देयक वेळेत न दिल्याप्रकरणी येथील दिवाणी न्यायालायने (वरिष्ठस्तर) बुलडाणा पालिकेची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे वॉरंट १४ जून रोजी काढले होते.

बुलडाणा : मालमत्ता कर आकारणी आणि संगणकीकरणाच्या कामाचे थकीत देयक वेळेत न दिल्याप्रकरणी येथील दिवाणी न्यायालायने (वरिष्ठस्तर) बुलडाणा पालिकेची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे वॉरंट १४ जून रोजी काढले होते. मात्र बुलडाणा पालिकेने मुख्याधिकारी रजेवर असल्याने २५ जून पर्यंत देयक देण्याचे मान्य करून मुदत वाढ मागितल्याने पालिकेची जंगम मालमत्ताजप्तीची नामुष्की टळली आहे.स्थापत्य कन्सलटंट, अमरावती या कंपनीने २००९ मध्ये बुलडाणा शहरातील मालमत्ता कर आकारणी आणि संगणकीकरणाचे काम घेतले होते. मात्र वेळोवेळी देयके देऊनही  पालिकने संबंधीत कंपनीचे देयक काढले नाही. त्यामुळे या प्रकरणी स्थापत्य कन्सलटंट, अमरावती या कंपनीने अमरावती दिवाणी न्यायालयात  दावा चालवला होता. त्यात अमरावती दिवाणी न्यायालयाने कंपनीचा दावा मंजूर करून बुलडाणा पालिकेने दोन लाख ८१ हजार १०५ रुपये दावा दाखल केल्याच्या तारखेपासून सहा टक्के वार्षिक दरवाढीने रक्कम कंपनीला अदा करावी, असा आदेश दिला होता. १६ सप्टेंबर २०१३ रोजी हा आदेश पारित करण्यात आला होता. मात्र पालिकेने त्याची अंमलबजावणी केली नाही. परिणामी या कंपनीने बुलडाणा दिवाणी न्यायालयात (वरिष्ठस्तर) २००/२०१६ नुसार दरखास्तदाखल केली होती. त्यावर दिवाणी न्यायालयाने बुलडाणा पालिकेची जंगम मालमत्ता जप्तीचा वॉरंट बजावला होता. त्यानुसार कोर्टाचे बेलीफ शखील अहेमद व कंपनीचे वकील अ‍ॅड. विधीश साकरकार (अकोला) यांनी कंपनीच्या अधिकार्यांसह जाऊन हा वॉरंट बजावला.मात्र बुलडाणा पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे हे रजेवर होते तर त्यांचा पदभार हा मलकापूर येथील मुख्याधिकार्यांना देण्यात आलेला आहे.परंतू बुलडाणा पालिकेत उपस्थित उप मुख्याधिकारी यांना आर्थिक देवाण घेवाणीचे अधिकार नव्हते. म्हणून वॉरंटच्या अनुषंगाने जी रक्कम न्यायालयात भरणा करावयाची होती ती भरणा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे बुलडाणा पालिकेने न्यायालयास २५ जून २०१८ पर्यंत  संपूर्ण रक्कम न्यायालयात परस्पर भरण्यात येईल. अशी लिखीत स्वरुपात विनंती केली. सोबतच जप्ती वॉरंट आणि आदेशाची पुर्तता करण्यासाठी २५ जून २०१८ पर्यंत मुदत वाढ द्यावी, असी विनंती केली आहे. त्यामुळे बुलडाणा पालिकेच्या जंगम मालमत्तेच्या जप्तीची नामुष्की तुर्तास टळली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा