शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

बुलडाणा जिल्ह्यात ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा मुबलक साठा; मागणीत झाली घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:20 AM

Remedesivir News जिल्ह्यात सध्या दररोज सुमारे २० इंजेक्शनची गरज पडत आहे. 

ठळक मुद्देकोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली आहे. इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची एक तक्रार समोर आली होती.

 लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कमी झाली असून, गंभीर रुग्णांचेही प्रमाण जवळपास ८० टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचीही मागणी तुलनेने कमी झाली आहे. परिणामी, जिल्ह्यात सध्या दररोज सुमारे २० इंजेक्शनची गरज पडत आहे. जेथे ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात १,१४५ रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा होता तो त्यामुळे आता ७०० वर आला आहे. सोबतच ऑक्टोबरमध्ये जेथे दररोज ३५ इंजेक्शन लागत होते ते आता निम्म्यावर आले असून, दररोज १५ ते २० इंजेक्शनची गरज पडत आहे. थोडक्यात जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली आहे.ऑक्टोबर महिन्यातच जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची एक तक्रार समोर आली होती. त्यामुळे आरोग्य  प्रशासनात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पाच सदस्यीय समितीही नियुक्त करण्यात आली होती. या समितीने या प्रकरणात कोविड समर्पित  रुग्णालयातील दोषी आढळलेल्या कक्षसेवकास निलंबित करण्यात आले होते. सध्या जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच गंभीर रुग्णांचे प्रमाणही जिल्ह्यात ८० टक्क्यांच्या खाली आले असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

ॲन्टिजन टेस्ट, औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध जिल्ह्यात वर्तमान स्थितीत रेमडेसिवीर इंजक्शनचा गरजेनुरूप साठा उपलब्ध आहे. अन्य अैाषधसाठाही उपलब्ध असल्याने कोविड समर्पित रुग्णालयात गोंधळाची स्थिती नाही, तसेच जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून, गंभीर रुग्णांचे प्रमाणही घटले आहे.  आरटीपीसीआर टेस्टला प्राधान्य देण्यात येत असून, रॅपिड टेस्टसाठी किट उपलब्ध आहे. त्याचा तुटवडा नाही. अन्य अैाषधसाठाही जिल्ह्यात मुबलक प्रमाणावर आहे. 

गंभीर रुग्णांचे प्रमाण कमीसध्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही कमी आहे. त्या उपरही संभाव्या आपत्कालीन स्थितीच्या दृष्टीने नियोजन केलेले आहे. गरजेनुरूप आवश्यक तेवढा साठा सध्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या