रासायनिक खत, कीटकनाशक औषधी व इंधन दरवाढीचे भाव गगनाला भिडल्याने शेती हा व्यवसाय तोट्यात जात आहे असे असतानादेखील शेतकरी कर्ज काढून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी हा तोट्यातला व्यवसाय पिढ्यान्पिढ्या करतच आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकते घेतले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अनेक भागांत शेत रस्ते नसल्याने शेतकरी अगोदरच बी-बियाणे व रासायनिक खते साठवून ठेवतात. मात्र, ऐन खते घेण्याच्या लगबगीत खतांच्या कंपन्यांनी कच्चा मालाचे दर वाढल्याचे कारण सांगत भाव वाढ केली आहे. त्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रासायनिक खतांची किंमत मागील वर्षी इतकीच राहणार असल्याचे जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात शेतकरी रासायनिक खते घेण्यासाठी कृषी केंद्रावर गेल्यास त्यांना वाढीव दरानेच खतांची किंमत सांगितली जात आहे.
पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:38 AM